मुंबई : वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले होते. विकास कामांचा आढावा घेतला निधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते. मुख्यमंत्री शिंदेंसमोरच हा सर्व प्रकार घडला. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकल्याचे समजते.
सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेले आहेत. तरी, देखील मतदार संघातील कामे होत नाहीत म्हणून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवावर भडकले.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. निधी मिळत नसल्याने काम रखडल्याचे सांगत अब्दुल सत्तार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांनाच धारेवर धरले.
यावेळी दोघांनमध्ये जोरदार खडाजंगी झाली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदार तसेच अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडल्याने सचिव देखील नाराज झाले.