ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण… धनंजय मुंडेंचे सलग सहा ट्विट

पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीटरवरुन जोरदार टीका केली आहे. (Dhananjay Munde criticizes Pankaja Munde) 

ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण... धनंजय मुंडेंचे सलग सहा ट्विट
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 1:28 PM

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना लस आणि ऑक्सिजनवरुन राजकारण तापलं आहे. बीडमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहीत आहे, असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीटरवरुन जोरदार टीका केली आहे. (Dhananjay Munde criticizes Pankaja Munde on Corona Vaccine)

धनंजय मुंडे यांचे सलग सहा ट्वीट

“अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,” अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा

जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. (Dhananjay Munde criticizes Pankaja Munde on Corona Vaccine)

ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.

राजकारण इतरत्र जरूर करा,पण…

जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको.

कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? असा सवालही धनंजय मुंडेंनी केला आहे.  (Dhananjay Munde criticizes Pankaja Munde on Corona Vaccine)

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं होतं.

“REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. 

संबंधित बातम्या :

बीडमध्ये कोरोना लसीचा तुटवडा, पंकजा मुंडे म्हणतात, सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.