शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, जयंत पाटलांची टीका
बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. (Jayant Patil Critics Central government)
अकोला : भाजप आणि पंतप्रधान फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले, तीच संसद आज द्वेषापाई बदलली जात आहे. त्याजागी नवीन संसद बनवली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. (Jayant Patil Critics Central government)
देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांशी आपल्याला पुढे सामना करायचा आहे, त्यामुळे आपण आपले संघटन मजबूत करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार आहे. फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारांना गती देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. आपण अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेदरम्यान अकोला येथे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी पत्रकार परिषदेत सद्य स्थितीतील विविध प्रश्नांवर मत व्यक्त केले. pic.twitter.com/oCI6RGvTam
— NCP (@NCPspeaks) February 7, 2021
अकोला येथे अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मला विश्वास आहे की, पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस चांगली कामगिरी करेल. महाराष्ट्रात हा आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. काँग्रेस, शिवसेनासोबत आहेतच, महाविकास आघाडीच्या नियमांना कोणताही धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस कशी मोठी होईल याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. (Jayant Patil Critics Central government)
अजितदादांचा अनोखा अंदाज, आधी सायकलची पाहणी, मग दिव्यांगांशी संवादhttps://t.co/MM3rabFuKH #AjitPawar #baramati @AjitPawarSpeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
संबंधित बातम्या :
अजितदादांचा अनोखा अंदाज, आधी सायकलची पाहणी, मग दिव्यांगांशी संवाद