नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल, मोठा निर्णय घेत म्हणाले…

मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर आता सर्वच मंत्र्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यातच आता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठा निर्णय घेतला आहे.

नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल, मोठा निर्णय घेत म्हणाले...
nitesh rane
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 8:17 AM

Nitesh Rane Big Decision : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यावेळी 33 आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर आता सर्वच मंत्र्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यातच आता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठा निर्णय घेतला आहे.

नितेश राणे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक ट्वीट शेअर केले आहे. यात त्यांनी त्यांच्या नावाचे एक अधिकृत पत्र काढले आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच ही प्रत सर्व महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग यांनाही पाठवण्यास सांगितली आहे.

नितेश राणेंच्या पत्रात काय?

“मी आपणांस असे सूचित करतो की, माझ्या प्रत्येक जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये, अशी सूचना आपल्या अधिकाऱ्यांना देण्यात यावी”, असे नितेश राणे यांनी नमूद केले आहे. त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र बंदरे विकास विभागाची आढावा बैठक

दरम्यान नितेश राणे यांनी नुकतंच महाराष्ट्र बंदरे विकास विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. मुंबईतील महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या इमारतीत ही बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीदरम्यान वाढवण बंदराचे सविस्तर सादरीकरण देखील करण्यात आले.

महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंदरांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. गुणवत्तेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त ताकीद नितेश राणेंनी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही नितेश राणे म्हणाले.

मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.