डांबर टाकलंय की नुसत्या रेघा ओढल्यात? राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाची पाहणी करुन संबंधितांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश प्राजक्त तनपुरेंनी दिले आहेत.

डांबर टाकलंय की नुसत्या रेघा ओढल्यात? राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 12:09 PM

मुंबई/अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते आणि नागरी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामावरुन अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. अहमदनगर दौऱ्यावर असताना खड्डे बुजवण्याच्या कामातील हलगर्जी दिसून आल्याने तनपुरेंनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापले. (Minister Prajakt Tanpure slams senior officers for Negligence in filling the pits)

प्राजक्त तनपुरे यांनी वांबोरी-अहमदनगर रस्त्यावर खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. खड्डे बुजवण्याच्या कामात डांबर, खडी योग्य प्रमाणात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संबंधात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आणि संबंधितांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

“माझ्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या बाबतीत कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या कररुपी पैशाचा विनियोग अत्यंत योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे, यावर माझे बारीक लक्ष असणार आहे” अशा शब्दात तनपुरे यांनी फोनवर समज दिली. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काय म्हणाले तनपुरे?

“कुलकर्णी साहेब नमस्कार, मी इथं डोंगरगणजवळ आहे. नगरवरुन वांबोरला जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम सुरु आहे. काल मी त्याचे स्पेसिफिकेशन्स मागवून घेतले. टेंडरची काय काय कंडिशन आहे, त्याचा काल सकाळी अभ्यास केला. खालचा डांबराचा जो थर आहे, तो अक्षरशः न दिल्यासारखाच आहे, मी स्वतः इथे स्पॉटवर आहे.” असं तनपुरे फोनवर बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येतं.

“हे असं नाही चालणार, एक तर पैसे इथे आणताना नाकी नऊ येतात आणि असा जर उपयोग होणार असेल, तर नाही चालणार. तुमचा कोण तो इंजिनिअर आहे, मला सस्पेंड झालेला पाहिजे. आपण दरवर्षी खड्डेच बुजवत राहायचं का? मला तुमची कॅटेगरी डिव्हिजन काय ते माहिती नाही, पण जो कोणी इंजिनिअर आहे, तो उद्याच्या उद्या सस्पेंड झालेला पाहिजे. जनतेच्या पैशाचं वेस्टेज आहे हे” अशा शब्दात प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना झाडलं.

अधिकाऱ्यांशी बोलून झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी टवले नावाच्या कंत्राटदाराला स्पीकरवर फोन ठेवून समज दिली. “डांबर टाकलंय की नुसत्या रेघा ओढल्यात? त्याचा नीट थर पसरवून खडी टाकली पाहिजे” असं तनपुरे म्हणाले.

(Minister Prajakt Tanpure slams senior officers for Negligence in filling the pits)

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी प्रवेशासाठी नगरचे अनेक नेते इच्छुक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ

मंत्रालयाबाहेर अंधारातच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा ‘जनता दरबार’

(Minister Prajakt Tanpure slams senior officers for Negligence in filling the pits)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.