Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccination : आरोग्य मंत्रालयाला NTAGI च्या शिफारसीची प्रतिक्षा; काय लागू शकतो महाराष्ट्रातील 6 ते 12 वयोगटासाठीच्या लसीकरणाला ब्रेक? 

12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगटातही लसीकरण कमी झालं आहे, ते वाढवण्यावर भर देणार आहोत. तसेच प्रीकॉशन डोसमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाईल, अशा सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या

Corona Vaccination : आरोग्य मंत्रालयाला NTAGI च्या शिफारसीची प्रतिक्षा; काय लागू शकतो महाराष्ट्रातील 6 ते 12 वयोगटासाठीच्या लसीकरणाला ब्रेक? 
लसीकरण Image Credit source: लसीकरण
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 5:40 PM

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, हे स्पष्ट आहे की कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व रूपे कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. तर वयोगटानुसार सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले होते. तसेच आपल्याला पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार असल्याचेही त्यांनी आपल्या या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यानंतर मात्र आता देशातील 5 ते 12 वयोगटातील बालकांच्या लसीकरणाला (Vaccination) काही कालावधीसाठी ब्रेक लागू शकतो असे वाटत आहे. त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्याच्या या माहितीनंतर महाराष्ट्रातील 6 ते 12 पर्यंतच्या वयोगटासाठी लसीकरणाला ब्रेक लागू शकतो.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया

देशातील 5 ते 12 वयोगटातील बालकांच्या लसीकरणावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्य मंत्रालय 5 ते 12 वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत NTAGI च्या शिफारशीची वाट पाहत असल्याचे सांगितलं होतं. तसेच त्यांनी सांगितलं की, 5 ते 12  वर्षांतील बालकांना कॉर्बेवॅक्स Corbovax आणि 6 ते 12  मधील बालकांना कोवॅक्सीन देण्यात येईल. भारताच्या औषध नियंत्रक जनरल DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता दिली होती.

कोरोनाच्या लाटेत लहान बालके

दरम्यान याच्याआधी आलेल्या कोरोनाच्या लाटेत लहान बालके आली नव्हती. मात्र कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमध्ये लहान बालके ही येत आहेत. त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. तसेच असेही सांगण्यात येत आहे की शाळा सुरू होताच लहान मुलांच्या बाधीतांची संख्या वाढेल. तर तज्ज्ञांच्या मते मागील तीन आठवड्यापासून लहान बालकांच्यात तापाचे प्रमाण दिसून येत असल्याचे म्हटले होते. त्यातच आता केंद्र सरकार लसीकरणाबाबत नवीन गाईड लाईन जाहिर करू शकते. ज्यात सांगण्यात येईल की देशात कधी आणि कुठे, कसे लसिकरण करता येईल.

लसीकरण वाढवणार

तर राज्यातील लसीकरणाची स्थिती आणि आगामी काळातील प्लॅनवर राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. त्यांनी लसीकरणात आपण केंद्राच्या सरासरी एवढे आहोत. जिथे कमी आहोत ते लसीकरण वाढवणार असल्याचे सांगितलं होतं. पुन्हा राज्यासमोर हे एक मोठं काम आहे. 6 ते 12 पर्यंतच्या वयोगटासाठी लसीकरण सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. तसेच पंतप्रधानांनी याबाबत सूचना केल्याचे त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे 12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगटातही लसीकरण कमी झालं आहे, ते वाढवण्यावर भर देणार आहोत. तसेच प्रीकॉशन डोसमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाईल, अशा सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही आमची रणनीती

सुरुवातीच्या काळात संसर्ग थांबवणे हे आमचे प्राधान्य होते, ते आजही तसेच राहिले पाहिजे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही आमची रणनीती तितक्याच प्रभावीपणे राबवायची आहे. युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला आहे. अशा वातावरणात आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. हे जागतिक संकट अनेक आव्हाने घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय अधिक वाढवणे अत्यावश्यक बनल्याचेही त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

Jharkhand Crime : धक्कादायक ! झारखंडमध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

According to RTI information : नरेंद्र मोदी की मनमोहन सिंग, 8 वर्षात सर्वाधिक केंद्रीय विद्यालये कोणी बांधली? माहिती अधिकारातून मिळाले उत्तर

Delhi Corona : राजधानीत कोरोनाचा धोका वाढला! 24 घंट्यात 100 नवे कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र, हजाराच्या घरात आढळतायेत रुग्ण

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.