दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या निर्णयासाठी सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहे.

दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश
supriya sule Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 10:21 PM

पुणे | 21 फेब्रुवारी 2024 : पुण्याजवळील दौंड रेल्वे स्थानक आता मध्य रेल्वेच्या सोलापूर ऐवजी पुणे विभागाला जोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकांतर्गत येणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या समस्या आणि गाऱ्हाणी तसेच तक्रारी मांडण्यासाठी पुणे परिसरातील नागरिकांना सोलापूर डीव्हीजनशी पाठपुरावा करावा लागायचा हा त्रास आता वाचणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ही मागणी केली होती. त्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने दौंड रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या सोलापूर डीव्हीजन जोडण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे दौंड स्थानक पुणे डीव्हीजनला जोडावे यासाठी पाठपुरावा करत होत्या.अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत त्यांनी हा प्रश्न मांडला होता. प्रवाशांना त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे कसे गैरसोयीचे होते, याबाबत वेळोवेळी त्यांनी नकाशासहीत रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले होते. इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित केला होता. केंद्र सरकारला याबाबत मागणी केली होती. दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे सुप्रिया सुळे त्यांनी सांगितले होते.

येथे पाहा पोस्ट –

प्रवाशांचा फायदा

दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटण्यासाठी त्यांना पुणे डीव्हीजन जवळचे आहे असे त्यांनी संसदेत सांगितले होते.

रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा काही इतर कामे करण्यासाठी पुण्यातील रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत दौंड स्थानकात पोहोचणे शक्य होईल त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी सुळे सातत्याने सरकारकडे करत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दौंड स्थानक येत्या एक एप्रिल पासून पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.