कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात फडणवीसांचा मोठा निर्णय, उज्वल निकम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिची हत्या देखील करण्यात आली, या प्रकरणात आता फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
कल्याणमध्ये आईकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला, बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. 23 डिसेंबर रोजी या अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आता हा खटला ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लक्ष घातलं आहे.या प्रकरणात तातडीनं कारवाई केली जाईल. ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे हा खटला लढवतील. ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. पीडित मुलगी ही मला माझ्या मुलीसारखी आहे. तिला न्याय मिळून देणं माझी जबाबदारी आहे. चार महिन्यांच्या आत आरोपीला कठोर शिक्षा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलं आहे.
शनिवारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली आहे. सर्वतोपरी सहकार्य करू, आरोपीला चार महिन्यांच्या आत शिक्षा होईल असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबाला दिलं आहे. तसेच पीडित कुटुंबाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करा असे आदेश देखील फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आता या खटल्याचं काम ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे पाहाणार आहेत. तसेच या प्रकरणात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. आरोपीला चार महिन्यांच्या आत शिक्षा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.