लॉकडाऊनमुळं हप्ते थकूनही प्रामाणिकपणा,14 लाखांच्या दागिन्याची बॅग मराठी रिक्षाचालकाकडून परत
मिरा रोड येथे राहणाऱ्या मराठी रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेल्या एका प्रवाशाची 14 लाख रुपये किमंतीची सोन्या चांदीचे दागिणे असणारी बॅग परत केली आहे. Iftikhar Ali Nadir Khan
मिरा भाईंदर: मिरा रोड येथे राहणाऱ्या मराठी रिक्षाचालकाने (Marathi Auto Driver) रिक्षात विसरलेल्या एका प्रवाशाची 14 लाख रुपये किमंतीची सोन्या चांदीचे दागिणे असणारी बॅग परत केली आहे. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक कऱण्यात येत आहे. इफ्तिखार अली नादीर खान (Iftikhar Ali Nadir Khan) असं त्या मराठी रिक्षाचालकाचे नाव आहे. इफ्तिखार खान यांनी 14 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची बॅग पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत केली आहे. (Mira Bhayandar Auto driver Iftikhar khan return 14 lakh rupee bag to passenger)
मिरा-भाईंदर शहरात रिक्षा चालवणारे रिक्षाचालक इफ्तिखार अली नादीर खान हे मूळचे मराठी आहेत. इफ्तिखार अली नादीर खान यांनी शनिवारी महिला प्रवाशाला काशिमिरा परिसरात सोडले. त्यानंतर रिक्षाचालक दुसऱ्या दिवशी सीएनजी भरण्यासाठी पंपावर गेला असता मागे असणाऱ्या जागेत त्याला शनिवारी एक महिला बॅग विसरल्याचे निदर्शनास आले. या बागेमध्ये कोणत्या वस्तू आहेत त्याची पाहणी न करता त्याने मिरारोड पोलीस ठाणे गाठले व यासंबंधीची माहिती दिली.
ही घटना काशिमिरा पोलीस ठाण्यात घडल्यामुळे पोलिसांनी त्यांना काशिमिरा पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार रिक्षाचालकाने काशिमिरा पोलीस ठाण्यात जाऊन बॅग दिली. इफ्तिखार अली नादीर खान यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती काशिमिरा पोलिसांना दिली. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख रुपयांची रोख रक्कम तीन मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे १४ लाख रुपयांचे साहित्य असल्याचे समोर आले.
पोलिसांनी सापडलेल्या मोबाईल फोन द्वारे संबंधित व्यक्तींना संपर्क साधला. त्यावेळेस ती महिलादेखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आली होती. यानंतर त्या महिलेने आपली बॅग असल्याचे पटवून दिल्यानंतर तिच्या ताब्यात देण्यात आली. रिक्षाचालकाने रिक्षा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केली आहे. लॉकडाउन मुळे गेल्या सात महिन्यांपासून हप्ते भरले नाहीत. मात्र, तरीदेखील प्रामाणिकपणे रिक्षात विसरलेली बॅग पोलीस ठाण्यात जमा केल्याने कौतुक केले जात आहे.
इफ्तिखार अली नादीर खान यांचं प्रामाणिकपणा दाखवण्याचं आवाहन
रिक्षात सापडलेली बॅग पोलिसांना देण्यासाठी गेलो. पण मिरा रोड पोलिसांकडे गेलो पण त्यांनी काशिमिरा पोलिसांकडे जाण्यास सांगितले. काशिमिरा पोलिसांनी पुढील कार्यवाही करत बॅग परत केली. रिक्षाचालक आणि कारचालकांनी प्रामाणिकपणा दाखल्यास ग्राहकांचा आपल्यावर विश्वास निर्माण होईल, असं इफ्तिखार अली नादीर खान यांनी सांगितलं.
इचलकरंजीत ‘अप्सरा’ आल्या, रिक्षा-स्प्लेंडर बाईक्सची अनोखी सौंदर्य स्पर्धा https://t.co/PxgOU49fog #Rickshaw | #SplenderBike | #Ichalkaranji | #Kolhapur | #BeautyContest
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2021
संबंधित बातम्या
इचलकरंजीत ‘अप्सरा’ आल्या, रिक्षा-स्प्लेंडर बाईक्सची अनोखी सौंदर्य स्पर्धा
Mohammed Siraj BMW | Platina ते BMW, रिक्षाचालकाचा मुलगा मोहम्मद सिराजची गरुडझेप
Mira Bhayandar Auto driver Iftikhar khan return 14 lakh rupee bag to passenger