अरे झाकणझुल्या तू वारकरी आहे का? असा सवाल करत अमोल मिटकरी यांची तुषार भोसले यांच्यावर जहरी टीका, काय म्हणाले अमोल मिटकरी
अजित पवार यांच्याकडून भाषणात आडनाव चुकल्याने भाजपच्या तुषार भोसले यांनी टीका केली होती, त्यावर अमोल मिटकरी यांनी एकेरी उल्लेख करत तुषार भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नाशिक : अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असतांना सावित्रीबाई फुले यांचे नाव उच्चारत असतांना सावित्रीबाई होळकर असा उच्चार केला होता. यावर अजित पवार यांनी ही चुक लक्षात येताच हे अनावधानाने बोलण्याच्या ओघात झाल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये अजित पवार हे माफी मागणार की ठाम राहणार असे म्हणत मग्रुरी कायम ठेवणार असे म्हंटले होते. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तुषार भोसले हे वारकरीच नसल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत केला आहे. याशिवाय एका मठातून लाथा घालून कसे हाकलून दिले आहे त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे असा इशारा अमोल मिटकरी यांनी देत तुषार भोसले हा झाकणझुल्या आहेत. याशिवाय शाडीग्राम नावाच्या माकडाने दिवसा गांजा ओढायला सुरुवात केली आहे का ? आणि हा कोणत्या पंथाचा आहे हे लवकरच सांगणार असल्याचे मिटकरी यांनी म्हंटले आहे.
कुठलाही धंदा नसल्याने हा नेहमीच अजित पवार यांच्यावर बोलत असतो, बोलण्याच्या ओघात आडनाव चुकत असेल तर तीळपापड होण्याचे कारण काय असं मिटकरी यांनी तुषार भोसले यांना म्हंटलं आहे.
याशिवाय टू वारकरी तरी आहेस का? वारकरी असल्याचे कुठले गुण तरी आहे का? लवकरच टू कोणत्या पंथाचा आहेस हे सांगणार असल्याचा इशाराही आमदार मिटकरी यांनी दिला आहे.
तुषार भोसले यांनी नेहमीच हिंदुत्व आणि वारकरी मुद्द्यावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
तुषार भोसले यांनी जहरी टीका केल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका होत असते, अशीच टीका करत असतांना मिटकरी यांनी एकेरी उल्लेख करत तुषार भोसले यांचा समाचार घेतला आहे.