मला मंत्रिपद का मिळालं नाही हे राजू शेट्टीच सांगतील, आमदार Devendra Bhuyar यांचा टोला
माझ्यात आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद हे राजकीय आणि वैचारिक असू शकतात. पण आमच्यात मनभेद नाहीत. शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांमध्ये मतभेद असत नाहीत. आमचे विचार वेगवेगळे असू शकतात.
अमरावती: माझ्यात आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात मतभेद हे राजकीय आणि वैचारिक असू शकतात. पण आमच्यात मनभेद नाहीत. शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांमध्ये मतभेद असत नाहीत. आमचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण शेतकरी हितासाठी आम्ही एकत्र येत असतो. आमच्यात दुरावा नाही. मी शेतकरी संघटनेच्या बाजूला गेलो असलो तरी मी चळवळीत कायम आहे, असं सांगतानाच मला मंत्रीपद का मिळालं नाही याबाबत राजू शेट्टीच चांगलं सांगू शकतील. सर्व अपक्षांना समान संधी मिळाली. मग देवेंद्र भुयार यांनाच मंत्रिपद का मिळलं नाही हे शेट्टीच सांगतील. मंत्रिपद वाटपाच्या सिस्टिममध्ये ते होते, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते, आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी लगावला. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला.
पूर्वी मी पश्चिम महाराष्ट्रात जात होतो. त्यामुळे माझं मतदारसंघात दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही ही शपथ मी घेतली. विकासासाठी मी आज महाविकास आघाडी सोबत आहे. ज्या दिवशी माझे नेते समजून घेण्यास कमी पडेल त्या दिवशी मोठा निर्णय घेऊ, असं देवेंद्र भुयार म्हणाले. राजू शेट्टी यांच्याशी एखाद्या वेळी बोलने होते. पण नेहमी नाही. काही गोष्टींवर उघड बोलता येणार नाही. काही राजकीय विषय असतात. बऱ्याच गोष्टी आम्ही ठरवून करत आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
आघाडीतून वेगळं होण्याचं वातावरण नाही
भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. त्यामुळे राजू शेट्टी त्यांच्या सोबत पुन्हा जाणार नाहीत. पण राजकीय समीकरण जोण्यासाठी राजू शेट्टी एखाद्या निर्णय घेऊ शकतात. शेट्टींनी महाविकास आघाडीपासून वेगळ व्हावे असे सध्याचे वातावरण नाही. वीजबिलाचा प्रश्न सोडला तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
मेळाव्याचा निमंत्रण नाही
राजू शेट्टी यांनी येत्या 5 तारखेला कोल्हापुरात संघटनेचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे मला निमंत्रण नाही. शेट्टी यांनी कारवाई केली तर ती मला सहन करावी लागेल. एखाद्या पक्षाशी जवळीक वाढली म्हणजे त्या पक्षात गेलो असं होत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या: