आमदार गोरे यांच्या वडिलांना अपघातावरुण संशय, आमदार जयकुमार गोरे यांच्या वडिलांना कसली आली शंका?
आमदार जयकुमार गोरे साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे म्हणजेच माण-खटावच्या दिशेने येत असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली.
पुणे : आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला त्यानंतर त्यांच्यावर पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहे, नुकतीच त्यांचे वडील भगवान गोरे यांनी भेट घेत आपल्या मुलाशी संवाद साधला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यावेळी भगवान मोरे म्हणाले मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसतांना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय. ते देखील आमच्या गावात म्हणजे फलटण मध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते. दरम्यान भगवान गोरे यांनीच शंका उपस्थित केल्यानं जयकुमार गोरे यांचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न होता का? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत जयकुमार गोरे किंवा त्यांच्याकडून हा अपघात कसा झाला याबाबत माहिती दिलेली नाही. त्यामुळे अपघात कसा घडला याचं गूढ अद्यापही कायम आहे.
साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण पहाटेच्या वेळेला अपघात झाला. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रस्त्यावरुण 70-80 फुटावरून गाडी खाली पडली. जयकुमार गोरे होते त्याच बाजूला गाडी आदळली त्यामुळे त्यांना दुखापत झाली असल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली होती.
आमदार जयकुमार गोरे साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे म्हणजेच माण-खटावच्या दिशेने येत असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली.
आज पहाटे 3.30 वाजता साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मात्र यानंतर जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी जयकुमार गोरे यांची भेट घेऊन विचारपूस केली. यामध्ये त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत काही प्रश्न उपस्थित केले आहे.
मात्र एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसतांना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय. ते देखील आमच्या गावात म्हणजे फलटण मध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते असं भगवान मोरे यांनी म्हंटलं आहे.