वर्ध्यात लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना 5 लाखांचा विशेष निधी देणार, नियोजन करा – आमदार रणजित कांबळे

ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत अनेक संभ्रम पाहायला मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. ज्या ग्रामपंचायती लसीकरण वेगाने पूर्ण करतील, अशा ग्रामपंचायतींना विशेष बाब म्हणून आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. त्याकरिता नियोजन करावे.

वर्ध्यात लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना 5 लाखांचा विशेष निधी देणार, नियोजन करा - आमदार रणजित कांबळे
Wardha Vaccination
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 2:49 PM

वर्धा : ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत अनेक संभ्रम पाहायला मिळतात (MLA Ranjit Kambale). त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. ज्या ग्रामपंचायती लसीकरण वेगाने पूर्ण करतील, अशा ग्रामपंचायतींना विशेष बाब म्हणून आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. त्याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी अधिकारी, कर्मचारी, सरपंचांच्या ऑनलाईन बैठकीत दिलेत (MLA Ranjit Kambale Announce Special Fund Of Rs 5 Lakh Will Be Given To The Gram Panchayats Who Complete The Vaccination In Wardha).

देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार रणजित कांबळे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, तहसीलदार रमेश कोळपे, राजेश सरवदे, श्रीराम मुंदडा, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती. गावात 90 टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनाही आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात येईल, असे सांगत, आमदार कांबळे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावाकरीता लसीकरणाची गरज व्यक्त केली.

सध्या 45 वर्षांवरील लसीकरण संथगतीने सुरु आहे. लवकरच 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होईल. तेव्हा केंद्रावर गर्दी राहील. त्यामुळे 45 वर्षांवरील सर्वांनी तातडीने लसीकरण करावे, असे आमदार कांबळे यांनी सांगितले. 60 वर्षांवरील वयोगटाच्या बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी तर दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेत. रक्तदाब, शुगर आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे त्यांनी लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

लसीकरणासाठी प्रबोधन करावे

सरपंचांनी  ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य घेत लसीकरणासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलिस पाटील, शिक्षक यांचाही जनजागृतीकरिता सहभाग घ्यावा. लक्षण दिसल्यास किंवा कोणाच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार कांबळे यांनी यावेळी केले. कोणालाही लक्षण दिसल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणीही स्वत:च्या मनाने औषध घेऊ नये, मोठे समारंभ टाळावे, गर्दी टाळावी, असे आवाहन केले.

वॉर्डनिहाय नियोजन करावे

गावात वॉर्डनिहाय माहिती गोळा करत लसीकरण करुन घ्यावे. नागरिकांनी अडचणी असल्यास संपर्क करावा. आवश्यक मनुष्यबळ पुरविले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.

लसीकरणाचा संभ्रम दूर करावा : डॉ. धात्रक

डॉक्टर अमय धात्रक यांनी लसीकरणाचे महत्त्व समजून दिले. लसीकरणाबाबतचा संभ्रम दूर व्हायला पाहिजे. लस सुरक्षित असून मृत्युदर कमी होतो. नागरिकांमधील संभ्रम लोकप्रतिनिधींनी दूर करावा. यापूर्वीही लसीकरणाबाबत वावड्या उठल्या होत्या. कोरोनामुक्त करायचे असेल तर लसीकरण गरजेचे आहे, असे सेवाग्रामचे डॉ. अमेय धात्रक यांनी सांगितले.

MLA Ranjit Kambale Announce Special Fund Of Rs 5 Lakh Will Be Given To The Gram Panchayats Who Complete The Vaccination In Wardha

संबंधित बातम्या :

ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा, गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी लसीकरण बंद

लसीकरणाचा 6 हजार कोटींचा चेक कुठे गेला? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत, लसीकरण जनजागृतीसाठी बीडच्या सलून चालकाचा भन्नाट उपक्रम

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.