भाजपकडून भुजबळांना संपविण्याचा प्रयत्न सुरु, आमदार रोहित पवार यांचा आरोप

भुजबळ यांच्या वक्तव्यांच्या पाठीमागे भाजपाचा हात आहे. भाजपामधील सर्वात हुशार नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उच्चार होतो. ही स्क्रीप्ट भाजप आणि देवेंद्रे फडणवीस यांनीच भुजबळ यांना दिली असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

भाजपकडून भुजबळांना संपविण्याचा प्रयत्न सुरु, आमदार रोहित पवार यांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 5:03 PM

बीड | 20 नोव्हेंबर 2023 : छगन भुजबळ साहेब फार मोठे नेते आहेत, ज्यात पैसा होता ती खाती भुजबळ यांनी सांभाळली आहे. ओबीसी खात्यात पैसा नसल्याने ते पद त्यांनी भूषवले नाही. त्यांच्या भाषणाची संपूर्ण स्क्रीप्टच भाजपाने लिहून दिली आहे. देवेंद्र फडणवीस फार हुशार नेते आहेत. त्यांनी खडसे आणि मुंडे यांना संपविले. मुंडे साहेब 2014 मध्ये मुख्यमंत्री होतील असे आम्हाला वाटले होते. भाजपाकडून ओबीसी नेत्यांची ताकद कमी करण्याचे कार्य सुरु आहे. पंकजा मुंडे यांना संपविले आहे आता भुजबळांनाही भाजपा संपवतील असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

भुजबळ यांच्या वक्तव्यांच्या पाठीमागे भाजपाचा हात आहे. भाजपामधील सर्वात हुशार नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उच्चार होतो. ही स्क्रीप्ट भाजप आणि देवेंद्रे फडणवीस यांनीच भुजबळ यांना दिली असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणसाठी 24 डिसेंबरपर्यंत शासनाने वेळ दिला आहे. या टाईमबॉंडवर आणखीन काही दिवस आपल्याला आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. त्यावर शासन काय मार्ग काढतंय हे पाहून ठरवावं लागेल असे एका प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी सांगितले.

पाणी योजनांवर पैसा खर्च करायला हवा

महाराष्ट्रातील ग्रामीण जनता सध्याच्या सरकारवर नाराज आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. तरूण वर्ग हतबल झाला आहे. वंचित घटकातील प्रश्न सोडविण्यासाठी युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे. लाखो रुपये बुलेट ट्रेनवर खर्च होत आहेत. जी महाराष्ट्राच्या काही कामाची नाही. जगाला दाखविण्यासाठी गुजरात ते मुंबई बुलेट ट्रेनचा घाट आहे. तो पैसा राज्यातील पाणी योजनांवर खर्च करायला हवा होता असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. क्रिकेट विश्वचषकावर बोलताना त्यांनी खेळात कोणी राजकारण आणू नये. अनेक नेते तेथे उपस्थित असल्याने खेळाडूंवर दबाव आला असेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. यात कोणी राजकारणमधे आणू नये असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.