विजयी होताच आमदारानं मानले जरांगे पाटलांचे आभार, म्हणाले विजयात मोठा वाटा

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज्यात 231 जागांसह महायुतीला मोठं यश मिळालं आहे. भाजप 131 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत.

विजयी होताच आमदारानं मानले जरांगे पाटलांचे आभार, म्हणाले विजयात मोठा वाटा
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 9:16 PM

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज्यात 231 जागांसह महायुतीला मोठं यश मिळालं आहे. भाजप 131 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील मोठी मुसंडी मारल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवार गटाला राज्यात 41 जागा मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे राज्यात फक्त 45 जागा आल्या आहेत. ज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सर्वाधिक 20 जागा, काँग्रेसच्या 15 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वात कमी 10 जागा आल्या आहेत.

मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव राहिल, त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मराठवाड्यात मतदारांनी देखील महायुतीच्याच बाजुनं कौल दिला आहे. मराठवाड्यात देखील महायुतीला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांनी आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे. विजय होताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय म्हणाले संदीप क्षीरसागर? 

विजय होताच संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या विजयाचं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. माझ्या विजयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा आहे. मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मी उद्या शरद पवार साहेब यांची देखील भेट घेणार आहे. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू नेमानी यांची देखील मी मुंबईमध्ये भेट घेणार आहे. एकनिष्ठतेला किंमत देऊन  पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली. माझ्या विजयाचं श्रेय बीडच्या जनतेचं देखील आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.