तर एकनाथ शिंदे यांना कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल; कुणी आणि कुणाला दिला हा इशारा?

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकांसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावर महायुतीच्या नेत्याने टीका केली आहे.

तर एकनाथ शिंदे यांना कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल; कुणी आणि कुणाला दिला हा इशारा?
CM Eknath Shinde
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 10:01 PM

पुण्याचे ‘हिट एंड रन’ प्रकरण भयंकरच आहे, अग्रवालचे अनेक कारनामे ऊघड होत आहेत. कारवाई समाधानकारक होत आहे, रवींद्र धंगेकर आयुक्तालयासमोर आंदोलनास बसले आहेत, आयुक्ताच्या बदलीची मागणी करीत आहेत, पण ही ती वेळ नाही. धंगेकर राजकीय स्टंट करीत आहेत. कुणीही नेता, मंत्री असो सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. गोवा कनेक्शन काय ऊघड झालं पाहिजे अशी मागणी महायुतीचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. शिवसेनेने शिक्षक – पदवीधर निवडणूकांसाठी अनिल परब आणि ज.मो. अभ्यंकर यांची निवड केली आहे. यावर अनिल परब यांनी वांद्रे येथे बॅनर लावण्याशिवाय काय केलेय. दीपक सावंत खरे निष्ठावंत होते ते विजयी होतील असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

अनिल परब अकलेचे तारे तोडत आहेत. कोणतीही चौकशी बंद होत नसतात. अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. गेल्या पावसाळ्यात मुंबईत नाले तुंबले नाहीत, ऊबाठा गटाला फोटोपाहून वंचीत राहावं लागलं, त्यांना श्रेय मिळालं नाही, म्हणून ते लंडनला गेले अशी टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की रात्री ११.३० वाजता मराठवाड्यातील बैठक लावण्यात आली, त्या बैठकीला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील होते. आमचे पालकमंत्री तर लीलावतीला दाखल आहेत असेही त्यांनी सांगितले.

तर निर्णय घ्यावा लागेल

गजानन किर्तीकरांनी ती भूमिका का घेतली ? याबाबत संशय आहे, बोलून दाखवलं नाही तरी त्यांनी मुलाबद्दल ही भूमिका घ्यायला नको. या मताचे आम्ही सारे नेते होतो, मुलाबद्दल त्यांनी भाष्य करायला नको होते, ऊबाठा गटाचा हा गेम त्यांच्या अंगलट आला, घरात भांडणं लावून हा कट आखला. त्यांनी शांत बसणं. हा पर्याय होता, त्यामुळे चर्चेला वाव आहे, समितीकडे हे प्रकरण गेलं आहे, दोन ते तीन दिवसात निर्णय होईल. मुख्यमंत्री अहवाल आल्यानंतर त्यांचा निर्णय घेतील असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. आनंदराव अडसुळ यांनी नवनीत राणा यांच्या लोकसभेतील विजयाबाबत नकारात्मक वक्तव्यं करीत मोठी टीका केली आहे. त्याबद्दल विचारता,’ अडसुळ हे जेष्ठ नेते आहेत, या नेत्यांनी कुठलीही वादग्रस्त वक्तव्य करता कामा नयेत, अन्यथा नाईलाजाने शिंदे यांना सांगावं लागेल की या लोकांना आवर घाला. नाही तर यांचा मार्ग तरी मोकळा करा त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल असेही संजय शिरसाट यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

तिथे आम्हाला काय बाया नाचवायच्या नाहीत …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या लंडन दौऱ्यावर टीका केली आहे. त्यावरुन इंग्लंडला जाण्याासाठी इंग्रजी यावे लागते अशी टीका सुनिल राऊत यांनी करीत मुख्यमंत्र्यांना  इंग्रजी येतं का ? असा सवाल केला आहे. यावर बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत सुट्टीवर असल्याने सुनिल राऊतवर ही वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांचा सुट्टी दौरा आहे, तिथून ते मराठवाडा दुष्काळाची पहाणी करतील, यांना डोंबिवलीत जायला वेळ मिळाला नाही, लोकं जळून खाक झालीत आणि हे सुट्टीत मग्न आहेत अशीही टीका शिरसाट यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आम्हाला इंग्लीश येते की नाही याची काळजी करू नका?, तिथे आम्हाला काय बाया नाचवायच्या नाहीत, फॉरेनच्या अप्सरा तुम्ही गोव्यातील जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये नाचवायचा, मी डोळ्याने पाहिलंय. आम्हाला मायबोली येते आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतो, तुम्हाला इंग्रजीचा अभिमान असेल तर लंडनला शिफ्ट व्हा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. आम्ही फुटू का राहू याची चिंता तुम्ही करू नका , तुमचे आमदार सांभाळा, १२ -१३ जणांना घेऊन गेले असते तर ते अबाधित राहीले असते. बाळासाहेबांनी जे जपलं त्याचा लिलाव तुम्ही केला. याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.