Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकर यांचं विधान, ती पत्रकार परिषद, संजय राऊत यांची लायकीच काढली, राऊत यांच्यावर जहरी टीका करणारे आमदार कोण?

सर्व्हेवर अंदाज बांधायचा नसतो, शरद पवार यांची एक सभा आठवतेय का? पावसामध्ये झालेली सभा सगळे सर्व्हे गुंडाळून टाकले होते, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं होतं.

आंबेडकर यांचं विधान, ती पत्रकार परिषद, संजय राऊत यांची लायकीच काढली, राऊत यांच्यावर जहरी टीका करणारे आमदार कोण?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 1:56 PM

अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सर्व्हे कधीच पूर्ण नसतो, शरद पवार यांच्या सभेनंतर तेथील जागा बदलल्या होत्या असं सीव्होटरच्या सर्व्हेवर भाष्य करत संजय राऊत यांना प्रकाश आंबेडकर यांनी लायकी दाखवली असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी जहरी टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीत कधीही बिघाडी होऊ शकते असंही म्हंटले आहे. आमदार संजय शिरसाठ यांनी सीव्होटरचा नुकताच आलेल्या सर्व्हेवर भाष्य करत असतांना शरद पवार यांचे उदाहरण देऊन सर्व्हेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. याशिवाय संजय राऊत दररोज कोणत्याही विषयावर बोलत असतात. ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नसतो त्याच्यावरही बोलत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत म्हणून जागा दाखवून दिली आहे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांनी लायकीच काढली आहे अशी जहरी टीकाच संजय शिरसाठ यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार यांनी जहरी टीका केली आहे, यामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत असा सवाल केला होता त्याचा संदर्भ दिल आहे.

सर्व्हेवर अंदाज बांधायचा नसतो, शरद पवार यांची एक सभा आठवतेय का? पावसामध्ये झालेली सभा सगळे सर्व्हे गुंडाळून टाकले होते, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं होतं.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी उमेदवार सुद्धा म्हणायला लागले होते की, पावसाला पण आत्ताच यायचे होते का? त्यामुळे अशा सर्व्हेवर काहीही नसतं, संजय राऊत यांच्या समाधानासाठी चांगले आहे., संजय राऊत यांना अत्यंत आनंद झाला आहे.

संजय राऊत जास्त फिरत नाही, भांडुप व्हाया मातोश्री आणि प्रभादेवी यांच्यावर असलेला माणूस सर्व्हेवर बोलायला लागला आहे. आजकाल ज्याला कसली माहिती नाही तो कशावरही बोलतो असा टोलाही संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.

म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी जी जागा दाखवली ना ती याच कारणामुळे जागा दाखवली आहे. आता तरी सुधारले पाहिजे. कोण संजय राऊत मी याला ओळखत नाही असे ते म्हणून लायकी दाखवली आहे.

ठाकरे-आंबेडकर यांची युती झाली त्यावेळीच सांगितलं होती की युती किती काळ टिकेल माहिती नाही, दोन दिवसांत भांडायला लागले आहे अजून निवडणुकाही लांब आहे असा टोला लगावत महाविकास आघाडीतही बिगाडी होईल असे शिरसाठ यांनी म्हंटलं आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.