“संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना मदत करणारेही सहआरोपी”, सुरेश धस यांचा घणाघात, म्हणाले “परभणीत…”

"परभणीमध्ये नेमकं कुणाचं काय चुकलं, याचं थोडंसं विश्लेषण होण्याची आवश्यकता आहे. एक अधिकारी सस्पेंड झाला आहे. आणखी कुणाची काही जबाबदारी असेल तर ते तिथे गेल्यानंतर कळेल. तिथल्या संघटनांनी बोलवले त्याच्यामुळे मी चाललोय", असे सुरेश धस म्हणाले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना मदत करणारेही सहआरोपी, सुरेश धस यांचा घणाघात, म्हणाले परभणीत...
आमदार सुरेश धस
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 11:18 AM

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परभणीच्या नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात आमदार सुरेश धसही सहभागी होणार आहेत. आता नुकतंच त्यांनी परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकाच्या मृत्यूबद्दल भाष्य केले.

“मी परभणीला मोर्चात जात आहे. संतोष देशमुख याचा खून झाला आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांचे निधन झालं आहे. या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी उहापोह होईल, जे घडले त्याच्यावर मार्ग का काढायचा, यावर चर्चा करु. याप्रकरणी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच 75 ते 80 टक्के मार्ग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काढला आहे. पण परभणीमध्ये नेमकं कुणाचं काय चुकलं, याचं थोडंसं विश्लेषण होण्याची आवश्यकता आहे. एक अधिकारी सस्पेंड झाला आहे. आणखी कुणाची काही जबाबदारी असेल तर ते तिथे गेल्यानंतर कळेल. तिथल्या संघटनांनी बोलवले त्याच्यामुळे मी चाललोय”, असे सुरेश धस म्हणाले.

“…ते देखील सहआरोपी म्हणून आत जाऊ शकतात”

“संतोष देशमुख हत्याप्रकरणी ज्या आरोपींनी मदत केली, ते देखील सह आरोपी आहेत. या भयंकर घटनेतील आरोपींना त्यांनी मदत करायला नको होती. ज्यांनी मदत केली ते देखील सहआरोपी म्हणून आत जाऊ शकतात”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

तसेच SIT पथकात वाल्मिक कराड यांचे जवळचे अधिकारी असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांच्या बदल्या करून आणून अतिशय त्याच्या अतिशय जवळचे लोक या यादीत आले आहेत. मात्र आता मुख्यमंत्री यामध्ये चेंज करणार आहेत, असे सुरेश धस म्हणाले.

यात अजितदादाचा काय दोष?

“अजित दादांच्याही ताफ्यात गाडी असेल तर यात अजितदादाचा काय दोष आहे, असं माझं म्हणणं नाही. खालच्या लोकांनी अजितदादाच्या ताफ्यामध्ये कोणाकोणाच्या गाड्या न्यायच्या, याच कुठेतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. ते तारतम्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळगला जातं नाही अस एकंदरीत चित्र आहे”, असेही सुरेश धस म्हणाले.

खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.