“दोन वेळा पडलेल्या निलेश राणेंवर माझे बोलण्याची इच्छा नाही”; ठाकरे गटाच्या नेत्याने राणेंची संस्कृती काढली
राणे पितापुत्र भाजपमध्ये आहेत, मात्र भारतीय जनता पक्षाला चालतं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वैभव नाईक यांनी राणे कुटुंबीयांवर टीका करताना त्यांनी
सिंधुदुर्गः गेल्या काही दिवसांपासून राणे पितापुत्रांकडून ठाकरे घराण्यावर व ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणातून लोकसभा निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान केले होते. तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ज्या निलेश राणे यांना मतदारांना दोन वेळा पराभूत केले आहे, त्यांच्यावर बोलण्याची माझी इच्छा नाही असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे आमदार निलेश राणे यांच्यावर टीका करताना इतरांवर टीका करून आपण चर्चेत यायचं एवढच राणे करतात अशी सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या पक्ष नेतृत्वावर बोलायचं, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं त्याचबरोबर अजित पवार यांच्यावरही बोलायचं त्याच बरोबर रोहित पवार यांच्यावर टीका करायची मात्र ही मंडळी लोकांचा नेतृत्व करणारी आहेत.
या मंडळींवर बोलून आपण प्रसिद्धी घ्यायची एवढेच काम निलेश राणे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राणे पितापुत्र भाजपमध्ये आहेत, मात्र भारतीय जनता पक्षाला चालतं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वैभव नाईक यांनी राणे कुटुंबीयांवर टीका करताना त्यांनी निलेश राणे यांना लक्ष्य केले आहे.
प्रसिद्धीसाठी ते वाटेल ते बोलतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. युवा सेनामार्फत आज कणकवली पोलीस स्टेशनला निलेश राणे यांच्याविरुद्ध निवेदन देण्यात आले आहे, त्यांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
निलेश राणे असो किंवा नारायण राणे यांच्याकडून वारंवार केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग होतो आहे. त्याचरोबर राणे यांना जनतेने दोन वेळा जागा दाखविली आहे आणि ह्यावेळी पण त्यांना लोक आपली जागा दाखवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ज्या शिवसेनेवर हे टीका करतात ती शिवसेना म्हणजे ठाकरे शिवसेनेचा ठाकरे हा ब्रँड आहे आणि ते कधीही ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ठाकरे हा ब्रँड लोकांच्या हृदयात आहे असा टोला त्यांनी आजच्या सुनावणीवर शिंदे गटाला लगावला आहे.