ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… मनसे नेत्याचा दोन राऊतांना इशारा
राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… असं म्हणत मनसे नेत्याने राऊतांना इशारा दिला.
राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही, असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला मनसे नेते अमेय खोपकर यांनी चोख प्रत्युत्तर दिल आहे. ‘ राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… ‘ असं म्हणत अमेय खोपकर यांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
कोकणात भाजपा नेते नारायण राणे यांचा विरुद्ध ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत असा सामना रंगणार आहे. त्याचदरम्यान प्रचाराच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे कणकवलीमध्ये एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. तेथे राज ठाकरे यांची तोफ धडाडणार अशी चर्चा आहे. त्या मुद्यावरून विनायक राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ‘ राज ठाकरे म्हणजे फुस्स झालेला लवंगी फटाका आहे, त्याचा कोकणामध्ये काहीच फरक पडणार नाही’ असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.
मात्र त्यांची ही टीका मनसे नेत्यांना काही रुचलेली नसून अमेय खोपकर यांनी ट्विट करत विनायक राऊत यांना थेट इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून एक ट्विट करत अेय खोपकरांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांना चांगलंच सुनावलं.
अमेय खोपकर यांचं ट्विट जसंच्या तसं..
राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. जनतेच्या कल्याणाचं कोणतंही काम न करणारे खासदार राऊत असोत किंवा रडत राऊत असोत, तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… आता होऊनच जाऊ दे
राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. जनतेच्या कल्याणाचं कोणतंही काम न करणारे खासदार राऊत असोत किंवा रडत राऊत असोत, तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 21, 2024
संदीप देशपांडेंनीही दिलं प्रत्युत्तर
दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही विनायक राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर पलटवार केला. ‘ आम्ही फुसकी लवंगी आहोत, इलेक्ट्रिक माळ की ॲटम बॉम्ब आहोत, हे ४ जूनला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्यांना कळेल. पण एक नक्की, यांचा फुगा फाटला आहे, रोज उद्धव ठाकरे त्यांच्यामध्ये हवा भरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या फाटलेल्या फुग्याने आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. त्यांनी स्वत:चं बघावं आणि पवार साहेबांकडून त्यांच्या फुग्याला ठिगळं लावून घ्यावीत’ असं म्हणत संदीप देशपांडे यांनीही राऊत यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं.