Raj Thackrey : महिलांना अशा प्रकारे पैसे देण्यापेक्षा…. लाडकी बहीण योजनेवरून काय म्हणाले राज ठाकरे ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं.

Raj Thackrey : महिलांना अशा प्रकारे पैसे देण्यापेक्षा.... लाडकी बहीण योजनेवरून काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 1:20 PM

विधानसभा निवडणुका समोर ठेवून मतदारांना, प्रामुख्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असा आरोप विरोधकांकाडून सातत्याने केला जातोय. मात्र विरोधकांच्या पोटात दुखतंय असं म्हणत सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात मग्न आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. जुलै महिन्यात घोषणा झालेल्या या योजनेसाठी आत्तापर्यंत लाखो महिलांनी अर्ज केले असून अनेकींचा खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे जमा झालेत. मात्र विरोधांकाची त्यावरून अद्याप टीका सुरूच असून आता त्यामध्ये एका नेत्याचे नाव जोडलं गेलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. ‘ जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘ राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांन अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा’ असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते झटून कामाला लागले असून त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल आणि आज ( 27-28 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस असून आज ते पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचा आढावा घेत आहेत. नागपूर, चंद्रपूर,भांडारा,गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे. तर काल त्यांनी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला.

लााडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची नाराजी

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य केलं. त्यावेळी ते काय म्हणाले जाणून घेऊया…

1) ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार.

2) सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल.

3) राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे.

4) महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे.

5) समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही.

ज्यांच्या पोटात दुखतं तेच अशी वक्तव्य करतात, महायुतीतल्या नेत्याचा पलटवार

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमधल्या नेत्याने त्यांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ‘ ज्यांच्या पोटात दुखतं तेच अशी वक्तव्य करतात’ असं म्हणत महायुतीमधील अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्या सर्व बहिणी आमचं स्वागत करत आहेत, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.