Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. राज यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 6:08 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. (MNS chief raj thackeray and his mother tested corona positive)

राज ठाकरे यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे.

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाहीमहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.

लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना कोरोनाची लागण

राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

मनसेचे सर्व मेळावे स्थगित

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सक्रिय

दरम्यान, आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. पुणे तसेच नाशिक पालिकेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. कार्यकर्ता मेळावा, नव्या शाखांची सुरुवात अशा माध्यमातून मनसेकडून पक्षविस्तार करण्यात येत आहे. राज ठाकरेदेखील यामध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यांनी पुणे तसेच नाशिक आणि मुंबईत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष केंद्रित केलंय. मात्र सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्व कार्यक्रमाला ब्रेक मिळाला आहे.

इतर बातम्या :

हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले

गुन्हेगारांसह पीडितांचाच न्यायालयाशी संपर्क यायला हवा, हा गंड आपण दूर करण्याची गरज: सरन्यायाधीश रमण्णा

नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, पाकच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; नितेश राणेंचा गंभीर आरोप

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.