तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग ? – राज ठाकरे

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. रुग्णालयात गेल्या 24 तासात तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे राज्य शासनावर टीका करण्यात येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या मुद्यावरून सरकारला धारेवर धरत टीकास्त्र सोडले.

तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग ?  - राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 10:11 AM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या कारभारावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. नुकतीच नांदेड मध्येही अतिशय धक्कादायक घटना घडली. तेथील शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यावरून सुरू झालेला गदारोळ शांत होतो न होतो तोच नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली. तेथे मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनावर चहूबाजूने टीका होत असून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या मुद्यावरून सरकारवर कडाडून टीका केली. तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही टीका करत शासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत..

काय म्हणाले राज ठाकरे ? त्यांचं ट्विट जसच्या तसं –

नांदेडमधील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली होती. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत आहेत, ते सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे, हे दुर्दैव आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, असा सल्लाही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

नांदेडपाठोपाठ घाटी रुग्णालयात 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

नांदेड येथील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. या घटनेपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली आहे. घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचलं आहे. घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं, अशी माहिती आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.