नुसतं बोलून नाही, करून दाखवलं; राज ठाकरे यांच्याकडून इतिहास संशोधक मंडळाला ‘इतक्या’ लाखांची देणगी

वर्तमानात कसं जगावं, आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजवून सांगत असतो. मागे केलेल्या चूका परत करू नयेत. इतिहासात उभे केलेले आदर्श पुढे न्यावेत, हे समजावं म्हणून इतिहास वाचला पाहिजे. प्रत्येकाने वाचला पाहिजे. खासकरून महाराष्ट्राचा इतिहास वाचला पाहिज, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नमूद केलं.

नुसतं बोलून नाही, करून दाखवलं; राज ठाकरे यांच्याकडून इतिहास संशोधक मंडळाला 'इतक्या' लाखांची देणगी
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 2:11 PM

पुणे | 10 फेब्रुवारी 2024 : वर्तमानात कसं जगावं, आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजवून सांगत असतो. मागे केलेल्या चूका परत करू नयेत. इतिहासात उभे केलेले आदर्श पुढे न्यावेत, हे समजावं म्हणून इतिहास वाचला पाहिजे. प्रत्येकाने वाचला पाहिजे. खासकरून महाराष्ट्राचा इतिहास वाचला पाहिजे. महाराष्ट्रात हजारो वर्षांचा इतिहास आहे, बाकीच्यांकडे भूगोल आहे. इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं ? हे शिकायला मिळाला पाहिजे त्यामुळे वाचला पाहिजे असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. आज त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

भारत इतिहास संशोधक मंडळाला लाखोंची देणगी

मी ही संस्था पाहिली, त्यांचं सर्वांचं काम पाहिलं. हे सगळं पहाच असताना मला, माझ्याकडूनही काही करावसं वाटतं आहे. म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे, माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आज संस्थेला २५ लाख रुपये देत आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. हे काम वाढलं पाहिजे, वृद्धींगत झालं पाहिजे. भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांपर्यंत हे काम पोहोचलं पाहिजे. हा साधासुधा इतिहास नाही. नुसत छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं म्हटलं इतिहास कळला असं होत नाही . त्यामुळेच हे काम वाढलं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं.

आमच्या रक्तात अजून इतिहास शिरायचा आहे

यावेळी त्यांनी एक आठवण सांगितली. ब्रिटन , इंग्लंडमध्ये तिथले लढवय्ये, महापुरूष यांचे पुतळे नाहीत. त्याबद्दल तिकडच्या माणसाला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला नाही आमच्याकडे चर्चिल वगैरे किंवा कोणत्याही महापुरूषाचे पुतळे नाहीत. त्यामागचं कारण त्याने सांगितलं. ते वाक्य फार महत्वाचं आहे. ‘ आम्हाला पुतळे उभे करण्याची गरज नाही कारण प्रत्येक ब्रिटीश रक्तात महापुरूष समावलेले आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा जयजयकार करावा असं आम्हाला वाटतं नाही.’ अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

पण आमच्या रक्तात अजून हा इतिहास, ते महापुरूष शिरायचे आहेत. आम्ही आमच्याकडच्या महापुरूषांना जातीत पाहतो, आणि जातीतून आम्ही इतिहास वाचायला सुरूवात करतो. हे सध्या महाराष्ट्राचं राजकारण आहे, अशी शब्दांत त्यांनी सद्यपरिस्थितीवर टीका केली.

बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते, 32 वर्ष त्यांनी ती वीट जपून ठेवलेली. बाळा नांदगावकरांनी यांनी 32 वर्ष जपून ठेवलेली बाबरी मशीदीची वीट नुकतीच राज ठाकरेंना दिली होती. आजच्या कार्यक्रमात त्यांनी ती वीट इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्त केली. ती वीट कधीची आहे हे कळणं गरजेचं आहे, त्यावर संशोधन होणं गरजेचं आहे, या हेतूनेही वीट मंडळाकडे सुपूर्त करत असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.