राज ठाकरे 4 मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर; मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. | Raj Thackeray

राज ठाकरे 4 मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर; मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 8:12 AM

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या 4 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मनसेच्या (MNS) निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. परंतु, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. (MNS chief Raj Thackeray will attend wedding of relatives of Udayanraje Bhosale in Nashik)

याशिवाय, राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी कृष्णकुंज निवासस्थानी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याची सूचना

मराठी भाषा दिनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात राज ठाकरे मास्क परिधान न करता आले होते. कोरोनाचा धोका असताना इतक्या लोकांच्या गर्दीत तुम्ही मास्क का घातला नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा राज ठाकरे यांनी ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर पत्रकारांना दिले होते. मात्र, आता नाशिकच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याच्या सूचना देऊन राज ठाकरे यांनी किमान आतातरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ऐकलं, अशी चर्चा सुरु आहे.

नाशकात भाजपला मनसेची टाळी, तरी सांगलीच्या अनुभवावरुन भाजपची चांगलीच खबरदारी

नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे रंगत वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भाजप खबरदारी घेताना दिसत आहे. स्थायी समितीचे भाजपचे 8 सदस्य गुजरातला रवाना झाले आहेत.

संबंधित बातम्या:

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला

(MNS chief Raj Thackeray will attend wedding of relatives of Udayanraje Bhosale in Nashik)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.