Raj Thackrey : राज ठाकरेंचं ‘मिशन विदर्भ’, लवकरच पहिली यादी होणार जाहीर ?

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विदर्भावर फोकस केले असून लौकरच ते अमरावती दौऱ्यावर येणार आहेत.

Raj Thackrey : राज ठाकरेंचं 'मिशन विदर्भ', लवकरच पहिली यादी होणार जाहीर ?
राज ठाकरे लवकरच अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत.
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 9:56 AM

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी येत्या काही काळातच तारीख घोषित होईल. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असे अंदाज वर्तवले जात असून अवघ्या महिन्या-दीड महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी मविआ आणि महायुती दोन्हींमधील नेते मंडळी, कार्यकर्ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. त्याशिवाय इतर पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील ॲक्शन मोडवर आले आहेत.

लोकसभा निवडणून न लढवता राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त बाठिंबा दर्शवला होता. मात्र विधासभा निवडणुकांसाठी मनसे सज्ज असून विविध जागांची चाचपणी सुरू आहे. कोणत्या जागेवरून कुणाला उमेदवारी द्यायची याचीही खलबतं सुरू झाली आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवली होती. यामध्ये विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला गेला. आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुढचा प्लानही आखला असून ‘मिशन विदर्भ’हे त्यांचे आगामी लक्ष्य आहे.

राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ असून 27 व 28 सप्टेंबर हे दोन दिवस ते अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. 27 तारखेला सकाळी 7.30वाजता राज ठाकरे यांचं अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते जोरदार स्वागत करणार आहेत.

यावेळी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे हे अमरावतीमध्ये बैठक घेणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, 27 सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती,बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढाव घेण्यात येणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी नागपूर, वर्धा,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करणार असल्याचेही वृत्त आहे.

राज ठाकरे -मुख्यमंत्र्यांची भेट, बंद दाराआड काय घडलं ?

राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आहेत. दोन दिवसांपूर्वीच, सोमवारी ( 23 सप्टेंबर) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच राज ठाकरेंनी राज्यातील विकास कामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ माजली.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.