Raj Thackeray: टेबलवर उभे राहून राज ठाकरे सभा घेतील, पण 9 एप्रिलला मनसेची सभा होणारच; बाळा नादगांवकर याचा इशारा
येत्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची सभा आहे. ठाण्यात जागा आणि मैदाने कमी आहेत. दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्याने परवानगी पोलीस परवानगी देत नाहीत.
ठाणे: येत्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची सभा आहे. ठाण्यात जागा आणि मैदाने कमी आहेत. दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्याने परवानगी पोलीस परवानगी देत नाहीत. सभा घेणार तर कुठे घेणार? परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावरच सभा घेणार. गडकरी रंगायतनच्या बाहेर रस्त्यावर पाहणी करणार . राज्य सरकारबाबत बोलायचे नाही. नामावली बंधने करत असतात. मात्र आम्ही शिवतीर्थावर (shivtirth) सभा घेतली होती. निर्बंध घातले तरी आम्ही सभा घेणारच. टेबलवर उभे करून राज ठाकरे यांना भाषण करावे लावणार. मात्र सभा ही होणारच हे नक्की आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी ठणकावून सांगितलं. साहेबांच्या सभेसाठी लहान जागा नकोच, असंही ते म्हणाले.
मनसे नेते बाळा नांदगावकर आज ठाण्यात आले होते. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे यावेळी पोलिस आयुक्तांच्या भेटीला आले होते. राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन बाहेर घेण्यात येणार आहे. त्याला परवानगी देण्यात यावी म्हणून नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांशी संवाद साधला. पोलिस आयुक्त जयजीत सिंग, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षण संजय धुमाळ आदींशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडिशी संवाद साधताना हा इशारा दिला. येत्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याआधीच नौपाडा पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना जागेच्या संदर्भाने समजपत्रं दिलं आहे.
त्यावर साहेबच बोलतील
भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेमध्येच नाराजी सुरू झाली आहे. त्याबाबतही नांदगावकर यांना विचारण्यात आले. मात्र, या विषयावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. या विषयावर स्वत: राज ठाकरे बोलतील. आम्ही न बोललेलं बरं, असं नांदगावकर म्हणाले. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा कायदा आहे. त्यावर साहेब बोलतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे काय बोलणार?
गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील विराट रॅलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी सरकावर जोरदार हल्ला चढवला होता. या भाषणात राज यांनी भाजपची भलामण केली होती. यावेळी त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशाराही दिला होता. भोंगे हटवले नाही तर आम्ही हनुमान चालिसा सुरू करू, असा इशारा राज यांनी दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. सत्ताधाऱ्यांनी राज यांच्यावर या मुद्द्यावरून टीका केली आहे. तर भाजपने राज यांच्या समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर मनसे सैनिकही या मुद्द्यावरून नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे येत्या 9 एप्रिल रोजी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राज हे शरद पवार यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या:
Vasant More left group… भोंग्यावरुन बोंबाबोंब! पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी WhatsApp ग्रुप सोडला
जरंडेश्वरबाबत ईडी कार्याला भेट देणार, सोमय्यांचा इशारा; राऊतांकडे मागितले पुराव्याचे कागद