Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेतील इंग्रजी भाषेतील बोर्ड फाडले, मराठी भाषेचा वापर करण्यावरुन मनसे आक्रमक; राज्यात कुठे-कुठे आंदोलन?

मनसेने मराठी भाषेच्या वापरावर जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. बँका आणि अन्य संस्थांना मराठीत व्यवहार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चारकोपमध्ये बँकेला नोटीस देण्यात आली आहे, तर पुण्यात आयसीआयसीआय बँकेवर कारवाई झाली.

बँकेतील इंग्रजी भाषेतील बोर्ड फाडले, मराठी भाषेचा वापर करण्यावरुन मनसे आक्रमक; राज्यात कुठे-कुठे आंदोलन?
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2025 | 2:23 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचा इशारा दिला आहे. आता मनसे पदाधिकाऱ्यांनी विविध बँकेच्या भेट घेऊन मराठी भाषेचा वापर करण्याबद्दल तंबी दिली आहे. आता मराठी भाषेवरुन मनसे आक्रमक झाले आहेत. मराठी भाषेबाबत मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चारकोपमधील बँकेला नोटीस दिली आहे. कृपया आम्हाला आमच्या स्टाईलने कारवाई करायची वेळ आणू नका, असे मनसेने म्हटले.

चारकोप विधानसभेचे विभागाध्यक्ष दिनेश साळवी म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तरी कित्येक ठिकाणी मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान होत असलेल्या घटना समोर आल्या आहेत. कामगार क्षेत्रातील नियम, ८० टक्के कामगार स्थानिक असले पाहिजे, त्यांना मराठी बोलता आले पाहिजे, पण असं होत नाही. म्हणून मनसे चारकोप विधानसभेच्या वतीने चारकोप विधानसभेतील, बँक, कंपनी/कारखाने, आस्थापने, मॉल आणि मनपा आर/दक्षिण विभागीय कार्यालयाला लेखी पत्र दिलेले आहे.

कामगार क्षेत्राचे नियम पाळले गेले पाहिजेत, सदर ठिकाणी मराठीत बोललं गेलं पाहिजे. पत्र व्यवहार मराठीत झाले पाहिजेत आणि मराठी भाषेचा व मराठी माणसांचा अपमान कुठेही झाला नाही पाहिजे. कृपया आम्हाला आमच्या स्टाईलने कारवाई करायची वेळ आणू नका, असा इशारा दिनेश साळवींनी दिला.

पुण्यात बँकांची तपासणी

तर पुण्यातही मनसैनिकांनी आयसीआयसीआय बँकेत तपासणी केली आहे. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी विविध आस्थापनेमध्ये दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत झाला पाहिजे असं सांगितले होते. यानंतर आता मनसेकडून आज पुणे शहरांमधील आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातोय की नाही याची तपासणी पुण्यातील बंडगार्डन येथील आयसीआयसीआय बँकेच्या मुख्यालयात करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज बंडगार्डन येथील आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यालयात भेट दिली. मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कार्यकर्ते बँकेच्या कार्यालयात जाऊन बँकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अधिकाऱ्यांशी संवाद साधून झाल्यानंतर बाहेर येताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बँकेत लावलेले इंग्रजीतील बोर्ड फाडण्यात आले. त्याचबरोबर बँकेच्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोर्ड देखील लावण्यात आला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँनर काढला

तर दुसरीकडे मुंबईच्या दादरमध्ये शिवसेनेनं लावलेला बॅनर मनसेने उतरवला आहे. शिवसेना भवनासमोर लावलेला मोठा बॅनर महापालिकेला बोलावून मनसेला काढायला लावला. समाधान सरवणकर यांनी बॅनर लावला होता. यात गंगाजल शुद्धच आहे, पण विचारांचं काय असा उल्लेख करत मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. मात्र या बॅनरवर आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर काढण्याचा निर्णय घेतला. पण राजकीय संघर्ष टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन ऐनवेळी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी हा बॅनर काढला. त्यामुळे राजकीय संघर्ष टळला.

'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.