Sandip Deshpande | ‘बेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा, आदित्य ठाकरेंचं गुजराती कंपन्यांना कंत्राट, लवकरच पोलखोल करणार’ मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा

'आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे. मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय. गुजराती कंपन्यांना मातोश्रीतून यांनी कंत्राटं दिलेत. मराठीचा पुळका आणता, मग मराठी कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाहीत........ असा सवालही मनसेनं केलाय.

Sandip Deshpande | 'बेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा, आदित्य ठाकरेंचं गुजराती कंपन्यांना कंत्राट, लवकरच पोलखोल करणार' मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा
आदित्य ठाकरे यांच्यावर संदीप देशपांडे यांची टीका Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 2:49 PM

मुंबईः मुंबई शहराअंतर्गत धावणारी सिटी बस सेवा अर्थात बेस्ट (BEST) ही भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. बेस्टने ज्यांच्याबरोबर करार केलाय, त्या कंपन्या कामागारांचा पैसा देत नाहीत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) वरदहस्तानेच अनेक कंत्राटी गुजराती कंपन्यांना देण्यात आले आहेत, असा आरोप मनसेने केलाय. बेस्टमधील कंत्राटी कामगारांचे पैसेही प्रशासनातर्फे देण्यात आले नाहीत. सण-उत्सव तोंडावर आलेत आणि कामगारांचा वर्षभरापासून पगार नाही, या स्थितीसाठी जबाबदार कोण, असा सवाल देशपांडे यांनी केलाय.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, ‘ बेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. पाच डेपोचे कंत्राटी कामगार आमच्याकडे आले आहेत. या कामगारांना गेल्या वर्ष भरापासून पगार नाही. गंभीर बाब म्हणजे त्यापैकी एका कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. गणपती, नवरात्रोत्सव तोंडावर आले असताना या कामगारांकडे पैसा नाही. बेस्टने ज्यांच्याबरोबर करार केलाय, त्या कंपन्या कामगारांचा पैसा देत नाही. त्यातच कंत्राटी कामगारांना नियुक्त करताना कंपन्यांनी या कामगारांकडून 20 हजार रुपये घेतले आहेत, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. पुढे ते म्हणाले, याआधी आम्ही तक्रार केली असताना कॅगचं ऑडिट करणार, असं आश्वासन दिलं होतं. मात्र पालिकेचा ऑडिट विभाग आधीपासूनच आहे. अजूनही 2200 जागा भरलेल्या नाहीत. येत्या काळात मनसे महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणार आहे. रोडसंदर्भातही काही पुरावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती लागले आहेत, असा इशारा देशपांडे यांनी दिलाय.

‘बेस्ट व्यवस्थापकांचं लक्ष नाही’

बेस्टमध्ये होणाऱ्या या गैरकारभाराकडे व्यवस्थापक लोकेश चंद्रा यांचं लक्ष नाही. किंबहुना ते या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. कामगार आणि मनसेच्या वतीने त्यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार केला आहे. मात्र आता 5 सप्टेंबर पर्यंत आम्ही अल्टीमेटम देत आहोत. 6 सप्टेंबरला आम्ही लोकेश चंद्रा यांना त्यांच्या केबिनमध्ये बसू देणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय..

‘मातोश्रीचं बेस्टचे कंत्राट गुजराती कंपन्यांना’

या सर्व प्रकारासाठी मातोश्री आणि आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप मनसेनं केलाय. ते म्हणाले, ‘आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे. मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय. गुजराती कंपन्यांना मातोश्रीतून यांनी कंत्राटं दिलेत. मराठीचा पुळका आणता, मग मराठी कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाहीत…….. असा सवालही मनसेनं केलाय.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.