शर्मिला ठाकरे यांचं जातीवर आधारीत आरक्षणावर मोठं विधान; चर्चेला तोंड फुटणार?

मराठा आंदोलनामुळे साऱ्या महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली असली तर त्यांनी उपोषण सुरुच ठेवल्याने चिंता वाढली आहे. त्यातच मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या एका भाषणातील विधानाची आठवण करुन दिली आहे.

शर्मिला ठाकरे यांचं जातीवर आधारीत आरक्षणावर मोठं विधान; चर्चेला तोंड फुटणार?
Sharmila Thackeray Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 6:38 PM

निवृत्ती बाबर, मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रावर मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. काल, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून मराठ्यांना आरक्षणासाठी सरकार कठीबध्द असून सरकारला आणखी थोडा वेळ द्यावा अशी मागणी करीत जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यावर मनोज जरांगे यांचे काही समाधान झालेले दिसत नाही. यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आरक्षणाच्या संदर्भातील एका विधानाची आठवण करुन दिल्याने चर्चा सुरु झाली आहे.

मराठा आंदोलनामुळे साऱ्या महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली असली तर त्यांनी उपोषण सुरुच ठेवल्याने चिंता वाढली आहे. यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय सहमती घेऊन सरकारने जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करीत सरकार कोर्टात टिकणारे आरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे. परंतू जरांगे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

यावर मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी एका कार्यक्रमात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या भाषणाची आठवण करुन दिली आहे. विलासराव यांनी एका भाषणात जातीनिहाय आरक्षण देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. एका जातीला आरक्षण दिले की दुसरी जात आरक्षण मागण्यासाठी समोर येत रहाणार आहे. त्यामुळे जातीनिहाय आरक्षण देण्याऐवजी, कोणत्याही जातीच्या पाठ्या लावण्याऐवजी जो गरीब असेल त्याला शिक्षण आणि नोकरीला प्राधान्य दिले पाहीजे अशी मागणी केली होती.

राज ठाकरे यांनी केली विनंती

एका जातीला आरक्षण दिले की दुसरी जात आंदोलन सुरु करते, धनगर आंदोलन करतायत, मुस्लीम आंदोलन करतायत, गरीब असतो तो प्रत्येक समाजात असतो, त्यामुळे त्याला आर्थिक निकषावरच आरक्षण दिले पाहीजे असे विलासराव यांनी एका भाषणात म्हटल्याचा दाखला यावेळी शर्मिला ठाकरे यांनी करुन दिला. राज साहेबांनी जरांगे यांना निवेदन दिलेले आहे, जरांगे याचं आयुष्य खूप महत्वाचे आहे, त्यांचं जिवंत असणं समाजासाठी महत्वाचे असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही राज साहेबांनी केल्याचे यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.