मनसे नेते वसंत मोरे यांचं ठरलंय…अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी स्पष्टच सांगितलं…
माझा इगो हार्ट होत नाही, कोअर कमिटी मीटिंग कुठेही घ्या शहर कार्यालय सोडून स्मशानभूमीत घ्या येतो, जिथं फुले सोडून काटे झाले, जिथ मोरे याचं पद गेल्यावर गुलाल उधळण केली जाते त्या पक्ष कार्यालयात जाणार नाही.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे चर्चेत आहे. कधी कार्यक्रमात बोलू दिले नाही म्हणून तर कधी त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने दिलेली ऑफर असेल, इतकंच काय तर कोअर कमिटीच्या कामावरून नाराज असलेले वसंत मोरे कायमच चर्चेत असतात. मागील महिन्यात वसंत मोरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांची नाराजी दूर होईल का ? वसंत मोरे मनसेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीचे घडयाळ हाती बांधणार का ? अशी उलटसुलट चर्चा पुण्यातील राजकारणात होऊ लागली आहे. मात्र, अमित ठाकरे यांच्या बैठकीनंतर वसंत मोरे यांनी या सर्व प्रश्नांवर थेट उत्तर दिलं आहे. यावेळी वसंत मोरे म्हणाले, विद्यार्थी सेना बैठकी सुरू त्यात मला बोलवलं 40 मिनिटे चर्चा झाली. माझी बाजू, अडचणी मांडल्या, आता कोअर कमिटी याच्याशी अमित ठाकरे बोलणार, माझी बाजू मांडणार, अमित ठाकरे यांना सर्व सागितले आहे.
चर्चेचा वेळ एक वाजता ठरली होती. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो म्हणून मी वेळ पुढची मागितली होती, त्यावरून आता कोअर कमिटीची बैठक सुरू आहे.
मनाच काही सांगत नाही ऑफर येतात, मी जायच असेल तर गेलो असतो, इतर पक्ष घेण्यास इच्छुक असतील तर माझा दोष नाही असं मोरे यांनी म्हंटले आहे.
माझिरे याची हक्कलपट्टी झाली त्यावर कोअर कमिटी बोलेल, माझिरेने पक्ष सोडला आता त्याचा विषय संपलाय आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.
माझा इगो हार्ट होत नाही, कोअर कमिटी मीटिंग कुठेही घ्या शहर कार्यालय सोडून स्मशानभूमीत घ्या येतो, जिथं फुले सोडून काटे झाले, जिथ मोरे याचं पद गेल्यावर गुलाल उधळण केली जाते त्या पक्ष कार्यालयात जाणार नाही
माझ्यासाठी आता कोअर कमिटी सोबत अमित ठाकरे यांनी बैठक घेतली, त्यांना बोलावलं आहे असाही खुलासा अमित ठाकरे यांनी केला आहे.
माझी नाराज असल्याचं कारण शहर कार्यलय जबाबदार आहे. 100 टक्के, वसंत मोरे यांच्या बाबतीत कारस्थाने झाली तिकडे त्या कार्यालयात मी जाणार नाही असे थेट उत्तर मोरे यांनी दिले आहे.
पत्रकाराचा पक्ष काढला तरी मी तुमच्याकडे येतो पक्ष काढा, कुठल्याही पक्षानी ऑफर दिल्या तरी मी दुसरीकडे जाण्यास इच्छुक नाही असंही मोरे म्हणाले आहे.
मनसेमध्ये बसवून येऊन मिटवायची इच्छा दिसत नाही, मी माझ्या कुटूंबात सगळे बसून मिटवतो इकडे तसे होताना दिसत नाही, माझ्याकडे सध्या फक्त प्रभाग आणि खडकवासला जबाबदारी आहे बाकी काही नाही अशी नाराजी मोरे यांनी बोलून दाखवली.