मनसेला मोठा धक्का; प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असातना मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.

मनसेला मोठा धक्का; प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 3:02 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांचा धडाका सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. हे सर्व सुरू असताना मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्र नव निर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील  भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना दिलीप दातीर यांनी पाठिंबा दिला आहे.  दिलीप दातीर हे माजी नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिलीप दातीर निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते, परंतु मनसेकडून दिलीप दातीर यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज होते. प्रचाराला शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना दातीर यांच्या नाराजीचा फटका हा मनसेला बसल्याचं दिसून येत आहे. दिलीप दातीर यांनी भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपची नाशिक पश्चमि विधानसभा मतदारसंघात ताकत वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिकचे माजी महापौर आणि मनसे नेते अशोक मुर्तडक यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.  अशोक मुर्तडक हे नाशिकचे माजी महापौर आहेत. मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष ते नाशिकचे महापौर होते. अशोक मुर्तडक यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्वमध्ये महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे. एकीकडे अशोक मुर्तडक यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यातच आता दिलीप दातीर यांनी आपली भूमिका जाहीर करत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांत मनसेला दोन धक्के बसले आहेत.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.