त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया

अजून जोमाने काम करु, या घटनेची कारणे शोधू असे आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.' (Raju Patil Comment On MNS Rajesh Kadam joins Shiv Sena)

त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 10:25 PM

कल्याण : शिवसेनेने कल्याण डोंबवली महापालिका (KDMC Election) निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (MNS Rajesh Kadam joins Shiv Sena) यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील त्यांच्या जाण्याने आम्हाला फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. (MNS MLA Raju Patil Comment On Rajesh Kadam joins Shiv Sena)

“एखादी मजबूरी असेल, इतर काही आमिषांना बळी पडले असतील ही दुदैवी गोष्ट आहे. आम्हाला कारण माहिती नाही. त्यांच्या जाण्याने आम्हाला फरक पडणार नाही. निवडणुका आल्या की साम, दाम, दंड आणि भेद वापरून आपल्या पदरात काही पक्षातील लोक पाडून घ्यायचे. याचाच हा एक भाग आहे,” असेही राजू पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर मनसेला खिंडार पडले आहे. ही बातमी झळकताच मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यलयात एकच गर्दी केली. सर्व कार्यकर्त्यांची भावना ऐकून घेत राजू पाटील यांनी एक बैठकही पार पडली. या दरम्यान अजून जोमाने काम करु, या घटनेची कारणे शोधू असे आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.’

राजेश कदम यांची फेसबुकवरुन माफी

तर दुसरीकडे राजेश कदम यांनी फेसबुकच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद, मला माफ करा, तुमच्यावर नेहमीच प्रेम राहिल, असे राजेश कदम म्हणाले. त्यावर राजू पाटील यांनी “त्यांची काही मजूबरी असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर त्यांचेही प्रेम आहे. त्यांचे काही घरगुती प्रश्न असतील. इतर काही गोष्टी असतील. आमचे चुकले असेल तर आम्ही माफी मागितली असती. त्याचे काही चुकले आहे. म्हणून त्यांनी माफी मागितली आहे,” असेही राजू पाटील म्हणाले.  (MNS MLA Raju Patil Comment On Rajesh Kadam joins Shiv Sena)

कोरोना काळात कल्याण लोकसभा क्षेत्रात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामे केली आहेत. भाजप शिवसेना युती तुटली आहे. त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आमच्यातील काही माणसे फोडून जमावजमाव केली असेल. मला नाही वाटत आगामी काळात त्याचा आम्हाला फरक पडल. जे व्हायचे आहे ते होणार आहे असा इशारा पाटील यांनी दिला.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे संस्थापक सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राजेश कदम यांच्यासोबत दीपक भोसले, सागर जेढे, कल्याण ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवबंधन बांधल्याने, मनसेला खिंडार पडलं.

राजेश कदम यांच्या प्रवोशामागे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी आहे.  त्यांनी विरोधी पक्षातील बडा नेता फोडून, मनसेची हवाच गुल केल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत आहे. जितके कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहे ते मनसेचे कट्टर कार्यकर्ते होते, स्थापनेपासून ते मनसेत होते. मात्र आता हेच कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने, मनसेला मोठा धक्का आहे.

राजेश कदम यांचा अल्पपरिचय

राजेश कदम हा चर्चेत असणारा चेहरा आहे. सत्ताधाऱ्यांवर नेहमी आसूड ओढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. राजेश कदम यांनी 2009  मध्ये डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविली होती. 2015 मध्ये महापालिका निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेला नेहमी धारेवर धरणारे नेते अशी राजेश कदम यांची ओळख आहे. (Raju Patil Comment On MNS Rajesh Kadam joins Shiv Sena)

संबंधित बातम्या : 

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.