कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्त वाढले, मनसे आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे टेस्टिंग लॅबची मागणी

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करण्याची मागणी केली (Raju Patil letter Uddhav Thackeray) आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्त वाढले, मनसे आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे टेस्टिंग लॅबची मागणी
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 4:18 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Raju Patil letter Uddhav Thackeray) आहे. कल्याण डोंबिवली परिसरात आतापर्यंत 7 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाने राजकीय कुटुंबातील लग्नाला हजेरी लावली होती. त्यामुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करण्याची मागणी केली आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत (Raju Patil letter Uddhav Thackeray) आहे. त्यामुळे एकंदरीत केडीएमसी आणि परिसरातील लोकसंख्या पाहता इथेही कोरोना टेस्टींग लॅब असणे आवश्यक आहे, अशी मागणी राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे.

“इंडियन कॉऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चकडून कोरोना टेस्टसाठी नवीन 8 प्रायव्हेट लॅबला परवानगी देण्यात आली आहे. यातील 4 लॅब मुंबईमधील आहेत. तर नवी मुंबई 2, ठाणे 1 आणि पुणे 1 अशा लॅब देण्यात आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली परिसरातही कोरोनाबाधित रुग्ण वाढताना दिसत आहेत. डोंबिवलीमधील रुग्ण सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. कोरोना टेस्टिंग लॅब नसल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथे टेस्टिंगसाठी जावे लागत आहे.

पण त्या लॅबमध्ये टेस्टिंग पेशंट जास्त आहेत. त्यामुळे रिपोर्ट येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे एकंदरीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि परिसरातील लोकसंख्या पाहता इथेही लॅब असणे आवश्यक आहे.

तरी कृपया कल्याण डोंबिवली परिसरासाठी कोरोना टेस्टिंगसाठी नवीन प्रायव्हेट लॅबला परवानगी देऊन सहकार्य करावे ही विनंती,” असे पत्र राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 77 पुणे – 24 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  12 कल्याण – 7 ठाणे – 5 नवी मुंबई – 6 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 कोल्हापूर – 1 गोंदिया – 1 पनवेल – 2 उल्हासनगर – 1 वसई विरार – 4 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 पुणे ग्रामीण-  1 पालघर- 1 जळगाव- 1 इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 193 

(Raju Patil letter Uddhav Thackeray)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.