महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; 2 फेब्रुवारीला रणनीतीवर काथ्याकूट, भाजपसोबत जाणार का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयार केली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी पक्षाने जोर लावलेला दिसतोय.

महापालिका निवडणुकीसाठी 'मनसे' मैदानात; 2 फेब्रुवारीला रणनीतीवर काथ्याकूट, भाजपसोबत जाणार का?
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 3:01 PM

मुंबईः आगामी मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी येत्या 2 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बैठक घेणार असून, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. मात्र, सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा होती. कोरोनाचा संसर्ग वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतील असा अंदाज होता. मात्र, ओमिक्रॉन विषाणूचा धोका म्हणावा तितकासा दिसत नाही. हे पाहता सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

महापालिकेसाठी जोर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयार केली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी पक्षाने जोर लावलेला दिसतोय. नाशिकमध्ये तर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे आणि इतर नेते मंडळींनी चार महिन्यांपूर्वीपासूनच जोर लावला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुण्यातही मनसेने जोर लावला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी औरंगाबादसह या साऱ्या शहरांचे काही दिवसांपूर्वीच दौरे केले. त्यानंतर आता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

काय ठरणार रणनीती?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे येथील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतः राज ठाकरे चर्चा करणार आहेत. ते तेथील परिस्थितीचा त्यांच्याकडून आढावा घेणार असल्याचे समजते. शिवाय यावेळी राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्रही देणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

युतीच्या चर्चेचे काय?

सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात एक बैठक झाली आहे. याबैठकीत काय झाले हे समोर आले नाही. मात्र, तेव्हापासून युतीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि भाजपमध्ये कसलिही युती झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर मनसेकडूनही असे वक्तव्य करण्यात आले. मात्र, आगामी काळात ही युती होणार का, यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.