उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे

लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे, अशा मनसे इशाराही राज ठाकरेंनी (Raj Thackeray On Markaz Corona Spread) दिला. 

उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 12:00 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (5 एप्रिल) रात्री 9 वाजता (Raj Thackeray On Markaz Corona Spread) आपआपल्या घरातील लाईट बंद करुन 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोनाविरोधात लढा देण्यास सांगितले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टीका केली. “पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता,” असे राज ठाकरे म्हणाले.

नवी दिल्लीत मरकजच्या प्रकारवरही राज ठाकरेंनी टीका (Raj Thackeray On Markaz Corona Spread) केली. “दिल्लीला मरकजचा प्रकार घडला. अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांच्या उपचार कसेल करताय तुम्ही? यांना कुठला वेगळा स्वतंत्र विभाग करावा आणि त्यांचे उपचार बंद करुन टाकावे. त्यांना या दिवसांमध्ये धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करायचं असेल की देश संपवू, असे राज ठाकरे म्हणाले.

या लोकांना फोडून काढलं पाहिजे

“हे लोक नोटांना थुंकी लावत आहे. भाज्यांना थुंकी लावत आहेत. नर्सेससमोर नग्न फिरत आहेत. लोकांच्या अंगावर थुकतात. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे नेमकं काय चाललंय?” असेही राज ठाकरे म्हणाले.

“मुसलमानांमधील काही औलादी आहेत जे काही असे कृत्य करत आहेत. या सगळ्यांना ठेचलं पाहिजे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लॉकडाऊन देशात काही दिवसांसाठीच आहे. नंतर आम्ही आहोतच,” असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरेंकडून पंतप्रधानांच्या भाषणावर टीका

“मी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. खरंतर वैद्यकीय यंत्रणा आज कशाप्रकारे राबवली जातेय, खरंच किती रुग्ण आहेत, मृतांचा आकडा नेमका किती आहे. संभ्रम अवस्था पदावरती बसणाऱ्यांनी संपवायची असते. ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांना समजतच नाही नेमकं पुढे काय होणार आहे? असा प्रसंग कधीच कुणासोबत घडला नाही. जगभर एकच गोष्ट घडते असं कोणी पाहिलं नाही. इतकी शांतता 92-93 च्या दंगलेतही पाहिली नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“पतंप्रधानांनी सागितलं आहे की, 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्ती पेटवायचे. पेटवतील लोकं. नाहीतरी घरात बसून काय करतील? हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, त्याच्याने परिणाम होत असेल तर कोरोनावर त्याने परिणाम होवो. पण नुसते दिवे घालवून, मेणबत्या पेटवून, टॉर्च लावून यापेक्षा मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं,” अशी टीकाही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर केली.

भारतात  ही परिस्थिती नाही 

“मी अमेरिकेची एक बातमी वाचली. त्याच्याकडे बंदूका दुकानात मिळतात. 30 ते 32 लाख लोकांनी बंदूका विकत घेतल्या. उद्या समाजा हे वाढलं. लोकं रस्त्यावर आले आणि लुटालूट सुरु झाली तर स्वसंरक्षणासाठी त्यांनी बंदूका घेतल्या.  सुदैवाने भारतामध्ये ही परिस्थिती नाही. आज अनेक ठिकाणी लोक पोलिसांना शिव्या देतात. पोलिसांवर हात टाकता?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

शिस्त न पाळणाऱ्यांमुळे या गोष्टी घडतात

“आपण शिस्त पाळली नाही तर मोठं आर्थिक संकट येईल. पंतप्रधान आले तेव्हा ते काहीतरी बोलतील असं वाटलं होतं. जे लॉकडाऊन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. रेशन मिळणार का? कालांतराने नोकरी राहील का? बॉर्डर सील केल्यात तर मग भाजीपालाचे ट्रक येतील का? जे शिस्त पाळत नाहीत त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. बातम्या येतात तेव्हा वाटतं अरे असं कसं हे घडू शकतं,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लोकांना गांभीर्यच नाही

“आता तर घरोघरी डॉक्टर झाले आहेत. कुणी म्हणतं गोमुत्र प्या, कुणी म्हणतं कादा तर कुणी लसूण खा म्हणतं. एवढे डॉक्टर काही उगाच मेहनत करत नाहीत. डॉक्टर, पाणीपुरवठा करणारे आणि वीजपुरवठा करणारे सर्व कर्मचारी, भाजीपाला मार्केटमध्ये काम करणारे शेतकरी हे सर्व त्यांचा जीव धोक्यात घालून सगळे करत आहे. सर्व ठिकाणी धान्य येत आहे.  सरकारही काम करतंय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस. एवढी सर्व यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करते आहे. तरीही लोकांना शिस्त लागत नाही. त्याचं गांभीर्यच कळत नाही,” असेही राज ठाकरे म्हणले.

“नेमकं काम कुठे चाललो आहोत? पुढे काय घडणार आहे? उद्या उद्योगधंदे बंद झाले. लोकांवरती कर्ज आहेत. त्याचा परिणाम सरळ नोकऱ्यांवर पडेल. लोकं अशाप्रकारे एकत्र आले आणि कोरोना वाढत राहिला तर लॉकडाऊन वाढतच राहणार. आज समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही सुज्ञही असावं लागतं. ही वेळ सरकारवर आरोप करण्याची नाही,” असेही राज ठाकरे (Raj Thackeray On Markaz Corona Spread) म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.