“मला खुर्चीचा मोह नाही, पण स्वप्न मात्र…”, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"जर तुम्ही जिवंत आहात असं वाटतं असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा", असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघात बोलत होते.

मला खुर्चीचा मोह नाही, पण स्वप्न मात्र..., राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 2:03 PM

Raj Thackeray Speech : “राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही उमरखेडमध्ये झाली होती. शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांना बघायला कोणी येत नाही. त्यांचं कुटुंब काय करतं ते ही बघत नाही. कारण आता माणसाची काही किंमतच उरली नाही. आमची मनंच मेली आहेत. जर तुम्ही जिवंत आहात असं वाटतं असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा”, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघात बोलत होते.

राज ठाकरे यांनी यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्यासाठी एक प्रचार सभा घेतली. यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीसह महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

“कोणालाच माणसाची किंमत उरली नाही”

“मला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. या मतदारसंघात पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. उमरखेडमध्ये शेतकरी आत्महत्या करतात, हे बघायला कोणी आलं नाही. त्यांचं कुटुंब काय करतय हे बघायला कोणी आलं नाही. कारण कोणालाच माणसाची किंमत उरली नाही. माणसाची किंमत देशात नाही परदेशात जाऊन करते. अमेरिकचे राष्ट्रध्यक्ष ओबामा हे पदावरून खाली उतरत असताना त्यांनी एक कायदा केला होता. जेवढे कुत्रे बॉम्बस्फोटात जातील, त्यांना तुम्हाला परत अमेरिकेत आणावा लागेल. ज्या देशात कुत्र्याची काळजी आहे तर माणसाची किती असेल?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

“आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा”

“एवढ्या आत्महत्या होत आहे, त्यावर काहीच नाही. कारण आमची मनंच मेली आहेत. आमच्याकडे तरुण तरुणी जिल्हा सोडून जात आहेत. आमदार खासदार यांना विचारत नाही. निवडणूक खेळ समजतात. निवडणूक झाली की आम्ही विसरून जाणार. यानंतर 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक होणार. आमची मनंच मेली आहेत, तुम्ही जर जिवंत आहेत असं वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

“मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही”

तुमच्या दूध, पाणीपट्टी हे राजकारणी ठरवितात. मी येताना रस्ता पाहिला, काय रस्ता आहे हा? एका बाजूला खडी टाकली आहे. मी असा रस्ता जगात पहिला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2024 साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या. मी विकास कसा होतो, हे पाहिलं आहे. मी नाशिकमध्ये रस्ते बनवले. किती वर्षे झाले पाहा, अजूनही ते तसेच आहेत. कंत्राटदारकडून टक्के घेणं बंद झाला की रस्ते चांगले होतात. मला रस्त्यात खड्डा दिसला तर खड्ड्यात बांधून मारेन असा दम मी कंत्राटदारला दिला होता, असा किस्साही राज ठाकरेंनी सांगितला.

सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त इच्छा पाहिजे. मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही. पण मला महाराष्ट्राच्या विकासाची नक्कीच स्वप्न पडतात. राज्यकर्ते आणि राजकीयच्या मेंदूत कमतरता आहे. 20 नोव्हेंबर ही तारीख जवळ आली आहे. सारखी सारखी संधी भेटत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.