मराठी पाट्यांबाबत मनसेची डेडलाईन जारी, खळ्ळखट्याकचा इशारा

स्थापनेपासूनच मनसे मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आली आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांचा आग्रह धरत आंदोलन केले आहे. आता लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा मराठी मुद्द्यावर आक्रमक होत खळ्ळखट्याक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मराठी पाट्यांबाबत मनसेची डेडलाईन जारी, खळ्ळखट्याकचा इशारा
MNSImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 1:27 PM

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : राज्यातील दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी भाषेत फलत असावेत असा नियम असतानाही या नियमाला हरताळ फासला जात आहे. या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत दिलेली डेडलाईन उद्या ( 25 नोव्हेंबर ) संपत आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनावरील नामफलक हे मराठीत लावण्याचे आदेश पारित केले आहेत. तसेच 2 महिन्याच्या आत ( 25 नोव्हेंबर 2023 पूर्वी ) या आदेशाची अमलबजावणी करावी असे म्हटल्याचे बॅनर मनसेने मुंबईत लावले आहेत. अजूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे मनसेने निदर्शनास आणून खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

मनसे मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आली आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांचा आग्रह धरत आंदोलन केले आहे. मनसेने राज्यातील दुकानांच्या आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत असाव्यात अशी भूमिका आधीपासूनच जाहीर केली आहे. मनसेने मुंबई महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त ( एम/ पूर्व ) देवणार गोंवडी यांना पत्र लिहून दुकान आणि आस्थापनाच्या पाट्या मराठी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा त्यात उल्लेख केला आहे. सध्या अनेक दुकाने आणि आस्थापणांवर मराठी पाट्या वा नामफलक नसल्याचे या पत्रात मनसेने म्हटले आहे. त्यामुळे सर्वौच्च न्यायालयाचा अवमान होत असल्याने याबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे मनसेने या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेश पायदळी तुडविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना तसेच न्यायालयीन आदेश न पाळणाऱ्या जबाबदार विभागीय अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर असलेच आणि पुढील होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल असे पालिकेला पाठविलेल्या पत्रात मनसेने म्हटले आहे.

मराठी पाट्यांचा मुद्दा ऐरणीवर

शिवसेनेतून फुटून राज ठाकरे यांनी स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केल्यानंतर मराठी मुद्द्यावर राजकारण केले आहे. स्थानिक मराठी भाषिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य आणि इतर मुद्द्यांवर मनसे नेहमीच आक्रमक राहीली आहे. आता मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई महानगर पालिकेने मध्यंतरी मराठी पाट्या नसलेल्या दुकांना नोटीस लावून दंडात्मक कारवाई केली होती. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मुंबई महानगर पालिकेत प्रशासक नेमला असून आयुक्त इक्बाल सिंह चहल प्रशासक म्हणून कारभार सांभाळत आहेत. त्यात लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर मनसेने मराठी मुद्दा हाती घेतला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.