25 नोव्हेंबर पर्यंत मराठी पाट्या लावा नाहीतर… दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर असून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदतही देण्यात आली होती. याचीच आता मनसेने पुन्हा आठवण करून दिली आहे.

25 नोव्हेंबर पर्यंत मराठी पाट्या लावा नाहीतर... दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 11:24 AM

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रात आणि मुंबई शहरात बहुतांश दुकानांची नावे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बऱ्याच काळापासून या विरोधात भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतून पाटी लावावी, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात येत आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर असून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदतही देण्यात आली होती. याचीच आता मनसेने पुन्हा आठवण करून दिली आहे. तसेच 25 नोव्हेंबर पर्यंत दुकानांची नाव मराठीत झाली नाही तर.. खळ्ळखट्याकचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. X ( पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ” आधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या ह्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता ५ दिवस उरले.

दोन भाषेत पाट्या करण्याची दुकान मालकांची इच्छा असेलच तर देवनागरी लिपीतली मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठी मधील नाव हे बाकी भाषेतील नावापेक्षा मुळीच छोटं नसलं पाहिजे.” असं त्यांनी नमूद केलं आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या कायद्याचा संदर्भही त्यांनी दिला आहे.

अनिल शिदोरे यांची पोस्ट जशीच्या तशी

अनिल शिदोरे यांची ही पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत अकाऊंटवर रिपोस्ट करण्यात आली आहे. ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ‘महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात’… शेवटचे ४ दिवस !’ असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले होते. पुढच्या दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दिवाळी आणि दसऱ्याआधी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाली वाढवण्याचा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानमे व्यापाऱ्यांना दिला होता. आता त्याला केवळ चारच दिवस उरलेले असून त्याची आठवण मनसेने पुन्हा करून दिली आहे.

यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून मनसैनिकांचं अभिनंदनही केलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.