मनसेचे अनोखे आंदोलन, रस्त्यावर पिंडदान करत कोणती मागणी केली ?

रस्त्यावर पिंडदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे केली मागणी मनसेने केली असून अनेक तक्रारी करून देखील मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने हे आंदोलन केले आहे.

मनसेचे अनोखे आंदोलन, रस्त्यावर पिंडदान करत कोणती मागणी केली ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 12:56 PM

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ही आपल्या आंदोलनाच्या (Protest style) हटके स्टाईलने सर्वांनाच परिचित आहे. खळखट्याक आंदोलन ही मनसेची सर्वाधिक ओळख असलेली आंदोलनाची पद्धत आहे. पण, नाशिकच्या (Nashik) मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवर अक्षरशः खड्डे (Patholes) पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याच मुद्द्यावर मनसेने निवेदन देत अनेकदा खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. परंतु, मागणी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने मनसेने पितृपक्षाचा मुहूर्त शोधत रस्त्यावरील पिंडदान करत आंदोलन केले आहे.

मनसेने केलेले हे आंदोलन पालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न असला तरी या अनोख्या आंदोलनाची चर्चा आता नाशिकमध्ये होऊ लागली आहे.

रस्त्यावर पिंडदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे केली मागणी मनसेने केली असून अनेक तक्रारी करून देखील मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने हे आंदोलन केले आहे.

पितृपक्षात पिंडदान करून स्वर्गवासी झालेल्या नातलगांना विविध प्रकारच्या भाज्यांचा नैवद्य दाखवत पूजाविधी केला जातो. अगदी तसाच प्रयत्न करत मनसेने आंदोलन केले आहे.

उपनगर परिसरातील जय भवानी रोड वर करण्यात आलेल्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर होत आहे. प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची चर्चा पालिका वर्तुळात देखील सुरू झाली आहे.

नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांच्या कामांचे पितळ अक्षरशः उघडे पडले आहेत, रस्त्यावर भले मोठे खड्डे पडत असून रस्ता खचल्याच्या घटना समोर आल्या आहे.

त्यामुळे आता मनसेने केलेल्या या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन घेणार का ? रस्त्यांचा प्रश्न तात्काळ मिटवणार का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.