अमित ठाकरे आज निवडणार नवे शिलेदार, राज्यातील पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थावर मिळणार नियुक्त्या
राज्यातील विविध शहरात जाऊन अमित ठाकरे यांनी दौरा करत आढावा घेतला होता, त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
प्रदीप कापसे, पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची नवी फौज बघायला मिळणार आहे. मनसेचे नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर विद्यार्थी सेनेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यातील विविध शहरांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी राज्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून चांगली पदं मिळावी यासाठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत असून आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसेत तरुणांची फौज अधिक बळकट करण्यासाठी अमित ठाकरे यांची आजची बैठक महत्वाची मानली जात आहे. अमित ठाकरे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी असल्याने त्यांचे नवे शिलेदार कोण असणार याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
राज्यात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेच्या नव्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहे. त्यासाठी शिवतीर्थ येथे बैठक पार पडणार आहे.
मनसेचे युवा नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थित ही बैठक पार पडणार असून नव्या नियुक्त्त्यांचे वाटप केले जाणार आहे.
राज्यातील विविध शहरात जाऊन अमित ठाकरे यांनी दौरा करत आढावा घेतला होता, त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
आजच्या बैठकीत विविध शहरातील पदाधिकारी सहभागी होत असतांना आपल्या पदरात मोठी आणि चांगली जबाबदारी पडावी याकरिता जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे.
त्यामुळे अमित ठाकरे यांच्या विद्यार्थी सेनेचे नवे शिलेदार कोण असणार आहे ? नव्या शिलेदारांच्या नियुक्त्या करतांना अमित ठाकरे यांच्याकडून जाहीर केल्या जाणाऱ्या यादीत कुणाचा नंबर लागतो आणि कुणाला डच्चू मिळतो याकडे मनसे वर्तुळाचे लक्ष लागून आहे.