राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचा मेगा प्लान, तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी जंगी तयारी
सोमवारी सकाळी वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) , नेते अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Mns) दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती (Shivjayanti) जोरदार साजरी केली जाते. उद्या सकाळी वाजता महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, ता.जुन्नर, पुणे येथे मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (Amit Thackeray) हे अभिषेक व पूजन करणार आहेत. तसेच सोमवारी सकाळी वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) , नेते अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस सौ.शालीनी ठाकरे यांनी केलेले आहे.
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार
उद्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परीसरात होणार आहे. तसेच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पक्षाचे नेते अभिजित पानसे व सचिव सचिन मोरे हे करतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांनी दिली. उद्या होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यास तमाम शिवभक्त, पक्षाचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केला. मनसेतर्फे साजरी होणाऱ्या या शिवजयंतीची सध्या चांगलीच चर्चा आहे.
मनसेच्या रॅलीला परवानगी नाकारली
सोमवारी होणाऱ्या शिवजयंतीवरून मनसे आणि शिवसेना पुन्हा आमनसामने आले आहेत. एकीकडे MIM च्या महाविकास आघाडीत येण्याच्या प्रस्तावावरुन भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय.तर दुसरीकडे शिवजयंतीसाठी रॅलीला परवानगी नाकारल्यानं राज्यात शिवसेनेचं सरकार आहे की MIMचं? असा सवाल मनसेनं केलाय. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर शिवजयंतीसाठी मनसैनिकांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कवर जोरदार तयारी केली. मात्र मनसेकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं मनसे नेत्यांनी मविआ सरकारवर ही तोफ डागलीय. दरम्यान शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले नाहीत, असं स्पष्टीकरण देतानाच विनायक राऊतांनी मनसेवर पलटवार केलाय. आगामी निवडणुकीत जोरदार तयारीसह उतरण्यासाठी मनसेकडून मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.