शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक APMC कडून खास मोबाईल App

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनं एका अनोख्या मोबाईल Appची निर्मिती केली आहे. या Appमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. या मोबाईल App चं नाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असं आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक APMC कडून खास मोबाईल App
नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 4:03 PM

नाशिक : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वारंवार होणारी फसवणूक बघता कृषी उत्पन्न बाजार समितीनं एका अनोख्या मोबाईल Appची निर्मिती केली आहे. या Appमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. या मोबाईल App चं नाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असं आहे. महत्वाची बाब म्हणजे या मोबाईल Appच्या माध्यमातून शेतमालाचे रोजचे भाव शेतकऱ्यांना समजणार आहेत.(Mobile app from Nashik APMC to prevent fraud of farmers)

मोबाईल Appवर बाजारभाव कळणार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीत नाशिक जिल्ह्यासह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातूनही शेतकरी आपला शेतमाल, पालेभाज्या, फळं विक्रीसाठी घेऊन येतात. शेतकऱ्यांची सुरक्षितता वाढावी आणि बाजारसमितीबाहेर होणारी त्यांची फसवणूक टाळता यावी यासाठी बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या संकल्पनेतून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती Appची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल App द्वारे शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात पालेभाज्या, फळं, कांदा, लसूण, बटाट्याला मिळालेला बाजारभाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना आपल्या मालाला मिळालेला भाव माहिती होईल.

शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी Appची निर्मिती

सध्या नियमनमुक्तीमुळं व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करत आहेत. लिलाव प्रक्रियेदरम्यान व्यापारी, आडते, हमाल आणि अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या मोबाईल App च्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीकडून या मोबाईल App ची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे App आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपली नोंद करण्याचं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलं आहे.

दर अमावस्येला लासलगाव बाजार समिती बंद

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत कांद्याच्या बाबतीत बाजार समितीने नावलौकिक कमवले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी उपबाजार आवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र, आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही विपदा येऊ नये म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात होती.

आज एकविसाव्या शतकात शेती पीके वाहतुकीसाठी आधुनिक वाहनांची उपलब्धता झाली आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले असून मंगळ ग्रहासह अनेक ग्रहांवर वेगवेगळे प्रयोग करत जीवसृष्टीचा शोध घेतला जात असताना दर अमावस्येला लासलगाव बाजार समितीत कांदा व धान्य लिलावात घटक कामकाजात सहभागी होत नसल्याने बंद ठेवण्याची परंपरा आजही अवलंबिली जाते ही विशेष आहे.

संबंधित बातम्या :

शहाद्याच्या नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन, 11 हजार सीड बॉल आणि 1 हजार रोपांचं वाटप!

एका शिक्षकानं नाशकातलं गाव गुलाबी केलं, राज्यपालांनाही पहाण्याचा मोह आवरला नाही, पाहा स्पेशल रिपोर्ट

Mobile app from Nashik APMC to prevent fraud of farmers

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.