कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी

मुंबई: राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं आणि भावना व्यक्त करणाऱ्या सदस्यांना निलंबितही केलं. मी गेली ५० वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या ५० वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभेचे उपाध्यक्ष […]

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 12:56 PM

मुंबई: राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं आणि भावना व्यक्त करणाऱ्या सदस्यांना निलंबितही केलं. मी गेली ५० वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या ५० वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली. तसेच हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.  (modi government should scrap farmer bill: sharad pawar)

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कृषीविधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली भूमिका मांडली. कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या ५० वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी पवारांनी केली आहे. (modi government should scrap farmer bill: sharad pawar)

राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह हे ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांवर चालणारे आहेत. पण कालच्या वर्तनांनी त्यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. सिंह यांच्याकडून आमचा भ्रम निरास झाला आहे, असं सांगतानाच सदस्यांना निलंबित करून आणि त्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला. त्यामुळे या सदस्यांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केलं. सिंह यांनी तिथे जाऊन गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं.

आरक्षण टिकलं पाहिजे

यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाविषयीही आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करायचं होतं. त्यामुळे मी दिल्लीला गेलो नाही. मराठा आरक्षणप्रश्नी तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकलं पाहिजे. मराठा आरक्षणावरील स्थिगिती उठवली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका असून सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

 शरद पवार-अशोक चव्हाण बैठक, मराठा आरक्षणाच्या पुढील रणनीतीवर चर्चा

अनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत, भाजपचा टोला

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

(modi government should scrap farmer bill: sharad pawar)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.