Uddhav Thackeray Cabinet Decision : मोहफूले, काजूबोंडापासून बनवल्या जाणाऱ्या दारुबाबत मोठा निर्णय, विदेशी मद्याचा दर्जा देण्याचा निर्णय
फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण राबविण्यात येणार आहे. त्याचा फायदा कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांना होणार आहे.
मुंबईः काजूबोंडे (Cashew Nuts), मोहफूले (Mohphule) यापासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्याचा दर्जा (quality of foreign liquor) देणारे धोरण राबवणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांना होणार आहे.
काजूबोंडे, मोहाफुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण.
सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा
महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. काजू बोंडांच्या रसापासून फेणी, वाईन, इथेनॉल, सीएनजी, व्हाईट स्पिरीट या उपपदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे सरकारकडून हे धोरण राबवले गेले तर त्याचा फायदा नक्कीच कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
आदिवासी बहुल पाड्यांना फायदा
मोहाच्या फुलांपासून दारु गाळण्याला शासनाकडून मान्यता दिली गेली तर याचा फायदा आदिवासी बहूल पाड्यातील नागरिकांना मिळणार आहे. यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन त्यातून रोजगार निर्मिती आणि अर्थसहाय्यहा मिळणार आहे. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.
सध्या काजू उत्पादक तोट्यात
या वर्षी अनेकदा शेतकऱ्यांना वळीव पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पडल्यामुळे त्याचा विपरित परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. हिवाळ्यामध्ये धुक्याचा परिणाम काजूच्या मोहरावर होऊन तो जळून जातो, तर आलेला मोहर जळूनही जातो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
संबंधित बातम्या
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात? कायदेज्ज्ञ म्हणतात बार काऊन्सिल सनद…