Mansoon Alert : विदर्भासह मराठवाड्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता, या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट
Weather Update : हवामान खात्याने गुरुवारसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही विभागात पावसाने थैमान घातले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात मोठ्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही विभागाला पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने अवघ्या एका आठवड्यातच बॅकलॉग भरुन काढला. मराठवड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. काही जण नदी-नाल्याच्या पूरात वाहून गेले. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही मंत्र्यांनी या भागाचा पाहणी दौरा केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत पोहचविण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.
काय आहे अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज विदर्भासहीत खानदेशमधील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरवती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर ओसरला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भासहीत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने फटका दिला. पण आता पावसाचा जोर उसरला आहे. त्याची तीव्रता कमी झाली आहे. पण हवामान खात्याने विदर्भासहीत मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरवती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागाला पाऊस झोडपून काढण्याची भीती आहे.
या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट
धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या भागात प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. नदी-नाल्यांना पूर असताना ओलंडण्याचे धाडस न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.