Maharashtra Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार : हवामान विभाग

येत्या काही तासात गोवा, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Monsoon Hit Maharashtra Today)

Maharashtra Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार : हवामान विभाग
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 11:15 AM

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासात गोवा, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Monsoon Hit Maharashtra Today)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस म्हणजे 11 ते 14 जून या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवा, कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वी मुंबईत काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. मुंबईतील दादर, मांटुंगा, कुलाबा, मालाड, कांदिवली या ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

मुंबईसह नांदेड, हिंगोली या ठिकाणीही दमदार पाऊस झाला. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस इतका पाहायला मिळत होता. मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तापमान 35 अंशावर घसरले. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तर दुसरीकडे हिंगोली परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यायी पुलाचा काही भाग वाहून गेला. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावाजवळील जलेश्वर नदीवरील पर्यायी पूलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे कुरुंदा गावाकडून टोकाई गडाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला (Monsoon Hit Maharashtra Today) आहे.

संबंधित बातम्या :

हवामान विभागाने मान्सूनचं वेळापत्रकच बदललं, पावसाळ्याचा हंगाम पुढे सरकत असल्याने निर्णय

गुड न्यूज! पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.