Monsoon Update: बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा 99% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळे बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Monsoon Update: बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा 99% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 6:48 PM

मुंबई : भारतीय हवामान विभागानं (IMD) पावसाचा यावर्षीचा पहिला अंदाज (Monsoon forcast) वर्तवला आहे. यावर्षी चांगला पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी सरासरीच्या 99 टक्के पाऊस बरसणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळे बळीराजाला (Farmers in India) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनियमित पावसामुळे गेलं वर्षभर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अवकाळी पाऊस, कधी वाढलेलं तापमान, कधी गारांचा मार, यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अशातच आता पावसाच्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांऱ्यांच्या जीवात जीव येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज कितपत खरा ठरतो, याबाबही आता चर्चां रंगवल्या गेल्या, तर नवल वाटायला नको!

थोडक्यात पण महत्त्वाचं :

  1. देशात यंदा सरासरीइतका पाऊस पडणण्याची शक्यता 40 टक्के आहे
  2. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असणारे भाग 15टक्के
  3. अतिवृष्टीची शक्यता असलेला प्रदेश 5 टक्के
  4. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 26टक्के
  5. अपुरा पाऊस पडण्याची शक्यता 14 टक्के
  6. पावसाळ्याच्या मध्यावधीपर्यंत ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता

स्कायमेटनं वर्तवलेला अंदाज काय होता?

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून नेहमीप्रमाणेच राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 880.6 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

दरम्यान, याआधी एप्रिलआधी फेब्रुवारी महिन्यातही स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस सामान्यच राहिल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या अंदाजातही स्कायमेटनं आपला अंदाज कायम ठेवला आहे.

वाचा हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज नेमका काय?

इतर बातम्या :

Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले

 ऊसतोड मजुरांसाठी कायपण! गाळप पूर्ण होण्यासाठी कारखान्याची अनोखी शक्कल

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.