आमदार फोडण्यासाठी किती दिवस…? काँग्रेस नेत्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

केंद्रात शरद पवार कृषी मंत्री होते. ते एक आव्हान आहे आणि ते आव्हान पेलले पाहिजे. शेतीवर आधारीत अर्थव्यवस्था आहे. शेती चांगली झाली तर अर्थव्यवस्थाही व्यवस्थित चालेल. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

आमदार फोडण्यासाठी किती दिवस...? काँग्रेस नेत्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल
CM EKNATH SHINDE AND DCM DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 7:39 PM

मुंबई | 18 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्र्यांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही आज सभागृहात अनेक मंत्री अनुपस्थित होते. NDA च्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दिल्लीला निघाले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात उपस्थिती लावली. याच दरम्यान विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्या ‘त्या’ तथाकथित क्लीपवरून सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद सभागृहात पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ काही मंत्रीही गेले. नेमकी हीच संधी साधून विधानसभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

हे सुद्धा वाचा

प्रश्नोत्तराच्या तासापासून लक्षवेधी सुचनापर्यत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री समाधानकारक उत्तर देत नाहीत. उपमुख्यमंत्री सर्व उत्तर देत आहेत. आमदार अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना सभागृहात वाचा फोडतात. पण, मंत्री या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाहीत. सभागृहात येताना ते कोणतीही तयारी करून येत नाहीत, माहिती घेऊन येत नाहीत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

हे सभागृहाला शोभत नाही.

कोणताही मंत्री समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. उत्तरासाठी उपमुख्यमंत्र्यांना उभे राहावे लागते हे सभागृहाला शोभत नाही. विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.

सत्तारुढ पक्षाने 293 अन्वये शेतीसंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. तब्बल दहा विषय एकत्रित करून हा प्रस्ताव मांडला होता. यात जलसंपदा, जलसंधारण, उर्जा, दुग्धविकास आदी दहा खात्यांचा विषय त्या विभागाशी संबंधित काही मंत्री सभागृहात हजर नव्हते यावरून बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले.

सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावात 25 ते 30 योजनांची नावे आहेत. सुंदर नावं दिली आहेत पण अंमलबजावणी होत नाही. एका योजनेचे तर ‘एक दिवस बळीराजासाठी’ असे नाव आहे. पण, प्रत्यक्षात ‘एक दिवस बळीराजा’साठी आणि बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी आहेत का? असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.