विदर्भात पेरणीला सुरुवात, शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी, सोयाबीनकडे कल जास्त

नागपूरसह संपूर्ण विदर्भात आता पेरणीची तयारी सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीलाही सुरुवात केली (Monsoon Sowing started in Maharashtra) आहे.

विदर्भात पेरणीला सुरुवात, शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी, सोयाबीनकडे कल जास्त
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 12:37 AM

नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात आता पेरणीची तयारी सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीलाही सुरुवात केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन पिकाकडे जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. (Monsoon Sowing started in Maharashtra)

नागपूरसह संपूर्ण विदर्भात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. येत्या एक-दोन दिवसात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करत पेरणी पूर्वीची मशागत पूर्ण केली आहे. अनेक शेतकरी बी-बियाणांच्या खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी करत आहे. (Monsoon Sowing started in Maharashtra)

या वर्षी दुकानात बियाणे आणि खतांचा मोठ्या प्रमाणात स्टॉक असल्याचे दुकानदार सांगतात. अनेक शेतकरी कापसाच्या पिकापेक्षा सोयाबीनला प्राधान्य देत असल्याचे खरेदीवरुन दिसत असल्याचं कृषी उद्योग दुकानदारांचं म्हणणं आहे.

यावर्षी बी-बियाणांची उपलब्धता ग्रामीण भागात सुद्धा होत आहे. त्यामुळे काही शेतकरी ग्रामीण भागात सुद्धा खरेदी करत आहे. शेतकऱ्यांनाची तयारी पूर्ण झाली असून मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई झाली आहे. शेतकऱ्यांची विदर्भात तयारी पूर्ण झाली असून आता बळीराजा कोरोनाला दूर सारत कामाला लागला आहे.

हिंगोलीत बियांणांचा तुटवडा 

तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतं बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या दिवसात खत-बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता भेडसावत आहे. कोरोनाच्या महामारीत आधीच हलाखीचे जीवन जगणाऱ्या बळीराजाने खत बियाणे खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पण दरवर्षी पेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने बियाणे खरेदी करावी लागत आहेत. त्यासोबतच खतेही अल्प प्रमाणात उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 77.66 मी.मी. पाऊस झाला. सोयाबीनची पेरणी केल्याने बियाणांची आणि पाण्याची बचत होते. तसेच उत्पन्नही वाढते. दरवर्षी हिंगोलीत 2 लाख 48 हजार हेक्टरवर सोयाबीन, तर 45 हजार हेक्टरवर कापूस लागवड होते.

सध्या जिल्ह्यात बीटी बियाणे सव्वा दोन लाख पॅकेट्स, सोयाबीन 1 लाख 61 हजार क्विंटल उपलब्ध आहे. खताचा पूरवठा हा 60 टक्के इतका झाला असून उर्वरित 40 टक्के खत सप्टेंबरमध्ये उपब्लध होणार असल्याच जिल्हा कृषी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले. (Monsoon Sowing started in Maharashtra)

संबंधित बातम्या : 

Flood Warning System | पावसाळ्यात मुंबईसाठी वरदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे ई-उद्घाटन

Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस

'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.